फूड

विदेश पदार्थ आता आपल्या किचनमध्ये; घरीच तयार करा पोर्तुगीज बेक्ड एग्ज

शर्वरी जोशी

काही जणांना नवनवीन पदार्थ तयार करण्याची आणि ते इतरांना खाऊ घालण्याची भारी हौस असते. त्यामुळे अनेक घरांमध्ये दररोज नवीन पदार्थ तयार होताना पाहायला मिळतात. यात काही गृहिणी तर पारंपरिक पदार्थांपासून पाश्चात्य पदार्थांपर्यंत अनेक नव्या डिश तयार करुन पाहात असतात. त्यातच आता प्रत्येक गृहिणीच्या हातात मोबाईल फोन आले आहेत. त्यामुळे अनेक जणी युट्यूबवर पाहूनही काही पदार्थ तयार करतात. विशेष म्हणजे काहींना पाश्चात्य पदार्थ करण्याची फार हौस असते. मात्र, हे पदार्थ करतांना त्यातील काही गोष्टी आपल्याकडे मिळणार नाहीत किंवा त्यांच्याप्रमाणेच आपल्याला ते तयार करता येणार नाहीत असं अनेकींना वाटतं. त्यामुळेच आज आपण अशीच एक पाश्चात्य आणि घरी सहज तयार करता येणारी रेसिपी पाहणार आहोत. या रेसिपीचं नाव आहे, पोर्तुगीज बेक्ड एग्ज. विशेष म्हणजे या रेसिपीचं नाव वाचूनच तुम्हाला तो नेमका काय पदार्थ आहे याचा अंदाज आला असेल. पण, हा पदार्थ नेमका कसा करायचा ते पाहुयात.

साहित्य -
४ चिकन सॉसेज स्लाइस 
१ कप पनीर किंवा रिकोटा चीज
८ अंडी
८ लसूण पाकळ्या बारीक चिरून
४ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
४ टोमॅटो
२ कांदे
४ चीज क्युब्ज किसून
 २ तमालपत्रं
१ चमचा ऑलिव्ह ऑईल, 
थाइम, ओरिगानो, पॅपरिका
 तिखट, मीठ, मिरपूड चवीनुसार,

कृती -
प्रथम एक पॅन घेऊन त्यात ऑलिव्ह ऑइल टाकून ते चांगलं तापवून घ्या. त्यानंतर त्यात कांदा, लसूण आणि तमालपत्र घालून ते परतून घ्या. कांदा-लसून परतून झाला की त्यात टोमॅटो,पनीर, सॉसेज व सगळे मसाले घाला. पुन्हा थोडा वेळा हे मिश्रण परतून घ्या व त्यात थोडंस पाणी घालून २० मिनिटं शिजवून घ्या. 

कांदा-टोमॅटो शिजून झाल्यावर गॅस बंद करा व हे मिश्रण एक बेकिंग बाऊलमध्ये काढा. परंतु, त्यापूर्वी त्यातील तमालपत्रं काढून टाका. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर त्यात अंडी फोडून घाला व चवीनुसार, मीठ- मिरपूड टाका आणि चीज किसून त्यावर पसरवा.  त्यानंतर हा बाऊल अॅल्युमिनिअम फॉइलने बंद करा. त्यानंतर ओव्हन प्री-हिट करुन १८० डिग्रीवर साधारणपणे २०-२५ मिनिटांसाठी ठेवा व बेक करा. अशाप्रकारे पोर्तुगीज बेक्ड एग्ज तयार होतो. हा पदार्थ तुम्ही ब्रेडसोबत छान लागतो.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT