Sabudana
Sabudana Sakal
फूड

Sabudana : कधीकाळी लाखोंचा जीव वाचवणारा साबुदाणा भारतात आला कसा?

सकाळ डिजिटल टीम

History Of Sabhudana : भारतात असे अनेक पदार्थ आहेत जे इतर देशांतून आले आहेत. मात्र, अनेकांना हे पदार्थ भारतीय नाही याची साधी कल्पनाही नाही.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

असाच एक पदार्थ म्हणजे साबुदाणा. भारतात करोडो लोकं उपवास आणि सणांच्या दिवसात साबुदाण्याच्या पदार्थांचे सेवन करतात. नवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात साबुदाण्याचे सेवन केले जाते.

आज आम्ही तुम्हाला ब्राझील आणि चीनमधून साबुदाणा भारतात कसा पोहोचला आणि याच्या सेवनामुळे कसा करोडो लोकांचा जीव वाचवला गेला होता याबाबत माहिती सांगणार आहोत.

साबुदाण्यात स्टार्चसोबत भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.

द बेटर इंडियाच्या अहवालानुसार, साबुदाणा टॅपिओका किंवा कसावा रूट किंवा कसावा मुळांपासून बनविला जातो. साफसफाई करून याचा चुरा केला जातो. यातून दुधासारखा द्रव बाहेर पडतो.

यातील सर्व घाण काढून टाकल्यावर तो घट्ट होतो आणि यंत्राच्या साहाय्याने याला गोल आकार दिला जातो. यानंतर ते वाफले, भाजले आणि वाळवले जाते. इतर काही स्टेप्सनंतर याचे रुपांतर साबुदाण्यात होते.

केरळच्या उपासमारीत वाचवले शेकडो जीव

टॅपिओकाची मुळं ब्राझीलमध्ये आढळतात. सीएन ट्रॅव्हलरच्या अहवालानुसार, चीनमध्ये हजारो वर्षांपासून याचा वापर अन्नात केला जात होता. पण त्याचा वापर सर्वप्रथम केरळमध्ये सुरू झाला.

सन 1800 मध्ये त्रावणकोर राज्यात मोठ्या प्रमाणात उपासमारी पसरली होती, ज्यामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

लोकांच्या मृत्युमुळे राजा अयल्यम थिरुनल रामा वर्मा आणि त्यांचा धाकटा भाऊ विशाखम थिरुनल महाराज खूप चिंतेत होते. त्यावेळी विशाखम हे वनस्पतिशास्त्रज्ञ होते. त्यांनी साबुदाण्यातील टॅपिओकामुळे उपासमार कमी केली जाऊ शकते असे सांगितले.

त्यानंतर याची तपासणी करून याला विशिष्ट पद्धतीने शिजवले तर, ते खाल्ले जाऊ शकते असे सांगितले. त्यानंतर त्यांनी हा पदार्थ नागरिकांना खाण्याचा आग्रह केला. मात्र, हा पदार्थ परदेशी असल्याने त्यात विष असू शकते असे म्हणत लोकं ते खाणे टाळू लागले.

लोकांचा हा भ्रम दूर करण्यासाठी राजाने हा पदार्थ शाही आहारात समावेश करण्याचे निश्चित केले. लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी राजाने सर्वात प्रथम याचे सेवन केले.

लोकांना यात कुठलाही धोका नसल्याचे पटल्यानंतर त्यांनीदेखील याचे सेवन करण्यास सुरूवात केली. यातील टॅपिओकामुळे उपासमारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या करोडो नादरिकांचे जीव वाचवण्यास मदत झाली.

सुरूवातीला केरळमध्ये याला कप्पा म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हळूहळू हा पदार्थ संपूर्ण भारतात पसरला. साधारण 1940 नंतर प्रक्रिया केलेला साबुदाणा चीनमधून आयात करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT