Maharashtra Din sakal
फूड

Maharashtra Din : सातारची चमचमीत गावरान रेसिपी; शेंगदाण्याचा म्हाद्या

आज आपण या सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या या खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत

निकिता जंगले

Satara Special Shengdana Mahadya : महाराष्ट्र हा आपल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्यात खाद्य संस्कृती महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात खाद्यसंस्कृतीमध्ये विभिन्नता दिसून येते आणि हिच खाद्यसंस्कृती त्या भागाची ओळख बनते.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेंगदाण्याचा म्हाद्या विशेष प्रसिद्ध आहे. इतर भागातील लोक याला शेंगदाण्याची आमटीही संबोधतात. आज आपण या सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या या खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत. (satara special shengdana mahadya recipe maharashtra din )

सातारा हा त्याच्या झणझणीत स्वभावासाठी ओळखला जातो. तशीच सातारी झणझणीत सातारी शेंगदाण्याचा म्हाद्या रेसिपी करण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य असावे -

साहित्य -

  • तेल

  • शेंगदाणे

  • कांदा

  • जीरे मोहरी

  • कांदा

  • लसूण मसाला

  • तिखट

  • हळद

  • हिंग

  • कोथिंबीर

  • पाणी

  • लसूण पाकळ्या

  • कडीपत्ता पाने

  • हिरवी मिरची

Satara Special Shengdana Mahadya

कृती

  • सुरवातीला शेंगदाणे भाजून घ्या

  • भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करा.

  • त्यानंतर कांदा चिरुन घ्या

  • लसूण आणि मिरची बारीक वाटून घ्या.

  • त्यानंतर कढईत तेल तापवा.

  • त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, बारीक वाटलेली लसूण आणि मिरची टाका त्यानंतर कांदा परतून घ्या.

  • त्यानंतर त्यात तिखट,कांदा लसूण मसाला आणि तिखट परतून घ्या.

    त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला आणि वरुन मिक्सरमधून बारीक केलेली शेंगदाण्याची भरड मिक्स करा आणि चांगलं परतून घ्या.

  • त्यात पाणी घाला आणि मिक्स करा. सात आठ मिनिटे शिजवू द्या

  • त्यानंतर वरुन कोथिंबिर घाला.

  • असा तुमचा शेंगदाण्याचा म्हाद्या तयार होणार. तुम्ही शेंगदाण्याचा म्हाद्या भाकरीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT