Schezwan Sauce esakal
फूड

Schezwan Sauce :  घरच्या घरी शेजवान चटणी बनवता येते, तर विकतची कशाला हवी?

आजकाल अनेक पदार्थात शेजवान सॉस, चटणी वापरतात

Pooja Karande-Kadam

Schezwan Sauce :

आपण शेझवान सॉस अनेक पदार्थांमध्ये वापरतो. जसे की पकोडा, ब्रेड पकोडा, किंवा समोसा किंवा कचोरी बरोबरही, त्याला चटणी म्हणतात. आजकाल लहान मुलेही ही झणझणीत पण चविष्ट चटणी खात आहेत. पण सतत विकतची चटणी मुलांना देणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

आपण सर्व प्रकारची लोणची बनवतो. पण आज आम्ही तुमच्यासाठी काही वेगळी रेसिपी घेऊन आलो आहे. आज मी तुम्हाला शेझवान सॉस कसा बनवायचा ते सांगणार आहे. ही चटणी बनवणे खूप सोपे आहे. आणि तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. ते बनवायला सुमारे 10-15 मिनिटे लागतात आणि ते तयार आहे. चला तर मग शेझवान सॉस बनवूया.

साहीत्य - सुखी लाल मिरची 100 ग्रॅम, काश्मिरी लाल मिरची 50 ग्रॅम, तेल 6-8 चमचे, बारीक चिरलेला लसूण ½, चिरलेले आले: 2 तुकडे, सोया सॉस 1 चमचा, टोमॅटो सॉस 2-3 चमचे, मीठ 1 चवीनुसार, साखर 1 चमचा, व्हिनेगर 3 चमचे,

कृती

  • सर्वात आधी लाल मिरच्या पाण्यात भिजवत ठेवा

  • त्यानंतर पाच मिनिटे उकळून घ्या

  • यानंतर मिरच्या मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या, हे मिश्रण बाजूला ठेऊन द्या

  • यानंतर गॅसवर कढई ठेऊन फोडणीची तयारी करा

  • कढईतील तेल तापल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेले आले आणि लसूण टाका

  • यानंतर यामध्ये मिरचीची पेस्ट घाला

  • यानंतर थोडं पाणी घालून झाकून सात ते आठ मिनिटे तसेच ठेऊन द्या

  • यानंतर यामध्ये सगळे सॉस घाला. तसेच चवीनूसार मीठही घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT