Sweet and Savory Fasting Dishes to Try During Chaturmas sakal
फूड

Shravan Fast Recipes: चातुर्मासासाठी खास चविष्ट, पौष्टिक आणि उपासाला परफेक्ट रेसिपीज, लगेच नोट करा

Delicious Shravan Fast Recipes for Chaturmas: चातुर्मासासाठी खास उपासाचे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ, लगेच करून पाहा!

सकाळ वृत्तसेवा

Healthy and tasty fasting recipes for Shravan month: आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. या चार महिन्यांत – श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक – सण-उत्सव आणि उपवासांची रेलचेल असते. उपवासाच्या दिवसांत बहुतेक वेळा साबुदाण्याची खिचडी हा पारंपरिक पर्याय निवडला जातो, पण याच काळात काही वेगळ्या आणि चविष्ट पदार्थांचाही आस्वाद घेता येतो. उपवासाच्या दिवशी पौष्टिक आणि स्वादिष्ट करण्यासाठी असेच काही खास, नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ...

शिंगाड्याची पौष्टिक खीर

साहित्य

अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी शिंगाडा पीठ, वाटीभर खोबऱ्याचा चव, वाटीभर गूळ, केशर वेलची सिरप, फळांचे तुकडे एक वाटी. चमचाभर डाळिंब दाणे.

कृती

दूध उकळत ठेवावे. शिंगाडा पीठ थंड दुधात कालवून त्यात घालावे. व मंद आचेवर सतत हलवत शिजत ठेवावे. त्यात खोबरे, गूळ घालावा. घट्ट वाटल्यास दूध घालावे. गूळ विरघळल्यावर केशर वेलची सिरप घालावे व हलवावे. शिजल्यावर खाली उतरावे. त्यात कुठल्याही फळाचे एक वाटी तुकडे घालावेत. गरम अगर गार कसेही आवडीप्रमाणे सर्व्ह करावे. यात सफरचंद, केळी, चिकू, सीताफळ असे कुठलेही फळ चालेल.

केळोऱ्या

साहित्य

वाटीभर नारळाचा चव, अर्धी वाटी गूळ, 3-4 बिया काढलेला खजूर, वेलची पूड, चमचाभर मिल्क पावडर, दोन चमचे सुकामेव्याची पूड, 1 चमचा भाजलेली खसखस पूड, 2 मोठी पिकलेली केळी, 2 ते 3 चमचे साबुदाणा पीठ, चवीपुरते मीठ, तूप, सुकामेवा काप.

कृती

पॅनमध्ये नारळ चव घालावा. गूळ चिरून घालावा. खजुराची पेस्ट करून घालावी व परतावे. मंद गॅसवर त्यात मिल्क पावडर, सुकामेवा पूड, खसखस पूड, वेलची पूड घालून हलवून सारण बनवावे. केळी वाफवून घ्यावीत. सोलून किसावीत. त्यात साबुदाणा पीठ, चिमूट मीठ घालावे. व तुपाच्या हाताने गोळा बनवावा. त्याच्या हाताने थापून पुऱ्या कराव्यात. एका पुरीच्या मध्यभागी सारण ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवावी. हलकेच कडाबंद कराव्यात. काट्याने किंचित दाब कडावर देऊन डिझाईन करावे. पॅनमध्ये थोडे तूप घालावे. त्यावर केळोऱ्या ठेवून शॅलोफ्राय कराव्यात. वर सुकामेव्याचे काप भुरभुरुन केळोऱ्या सर्व्ह कराव्यात.

राजगिऱ्याचा शिरा

साहित्य

वाटीभर राजगिऱ्याचे पीठ, वाटीभर साखर, दोन वाट्या दूध किंवा वाटीभर दूध, वाटीभर पाणी, 2 टेबलस्पून तूप, वेलची पूड, सुक्‍यामेव्याचे काप.

कृती

तुपावर राजगिऱ्याचे पीठ खमंग भाजून घ्यावे. त्यात गरम दूध अगर दूध पाणी हलके हलवत घालावे. चांगले मिक्‍स करावे. मंद गॅसवर ठेवून चांगली वाफ आणावी. कढल्यात तुपावर सुकामेवा काप परतून घ्यावे. शिजलेल्या पिठात साखर घालावी. हलके हलवावे. साखर विरघळ्यावर खाली उतरावा. वेलची पावडर घालावी. कडेने थोडेसे तूप सोडावे. सुकामेवा काप भरभरून गरमागरम डिश सर्व्ह करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: पेविंग ब्लॉकच्या खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेला; पुण्यातल्या 'या' मृत्यूला कोण जबाबदार?

Anil Ambani: अनिल अंबानींची ईडी करणार चौकशी; 17 हजार कोटींचा कर्ज घोटाळा, तपासात काय आढळले?

Tarot Horoscope August 2025: राज राजेश्वर योगामुळे मेष, मिथुनसह ४ राशींना लाभ; वाचा ऑगस्टचे टॅरो राशीभविष्य

Solapur News:'शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंतांचा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा'; निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी

August Long Weekend: ऑगस्टमध्ये लॉंग वीकेंड प्लॅनिंग करताय? मग 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा, आनंद दुपटीने वाढेल!

SCROLL FOR NEXT