sugarcane juice benefits 
फूड

उसाचा रस प्या, उन्हाळा सुसह्य करा!

शरीराला शांत ठेवण्यासाठी या काळात विविध पेयं प्यायली जातात

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेकांना उष्णतेचा खूप त्रास होतो. शरीराला सारखी पाण्याची गरज असते. त्यामुळे शरीराला (Body) शांत ठेवण्यासाठी या काळात विविध पेयं (Dinks) प्यायली जातात. तुम्हाला उन्हाळ्यात (Summer) डिहायड्रेशन होण्याची भीती वाटत असेल तर उसाचा रस नक्की प्या. कारण तो प्यायल्याने असा त्रास होत नाही. शिवाय यात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्याने एनर्जी मिळते. त्यामुळे शरीरासाठी उसाचा रस गुणकारी ठरतो. तो प्यायल्याने अनेक फायदे होतात.

summer season.jpg

उसाचा रस प्यायल्याने मिळणारे फायदे

- उन्हाळ्यात हिट वाढल्याने अनेकजण तात्पुरती तहान भागण्यासाठी आईस्क्रीम खातात. पण आईस्क्रीम सतत खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. अशावेळी उसाचा रस पिणे चांगले. कारण त्यामुळे तुमची तहान तर भागतेच. शिवाय काम करण्यासाठी उत्साह संचारतो.

- उसाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. या काळात जाणवणाऱ्या थकव्याचा त्रास कमी होतो.

Sugarcane juice

- उन्हाळ्यात अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात उसाचा रस प्यायल्याने तुमची तब्येत चांगली राहू शकते.

- उसाचा रस दातांचा त्रास असलेल्या लोकांनाही चालू शकतो. मात्र तो मर्यादित प्रमाणात पिणे चांगले मानले जाते.

- तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग असल्यास उसाचा रस प्यायल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होते. तुमच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT