Chicken Handi Sakal
फूड

एकाच चवीचं चिकन खाऊन कंटाळलात? रविवार स्पेशल चिकन हंडी बनवा आता घरी

नेहमी नेहमी त्याच पद्धतीने केलेले चिकन खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर ही रेसिपी नक्की वाचा

सकाळ डिजिटल टीम

रविवार असला की मासांहारी लोकांना चिकन खायची आपोआप तलप येते कारण बहुतांश घरात (मांसाहारी लोकांच्या) रविवारी चिकन किंवा मटन असतचं. नेहमी नेहमी त्याच पद्धतीने केलेले चिकन खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर ही रेसिपी नक्की वाचा.

आज आपण बघणार आहोत रविवारी स्पेशल चिकन हंडी

*चिकन हंडीकरता लागणारे साहित्य

1) एक किलो चिकन (मध्यम आकाराचे तुकडे करून)

2) दोन मोठे बारीक चिरलेले कांदे

3) दोन टोमॅटोची बारीक केली पेस्ट

4)200 ग्रॅम्स दही

5) तेल

6) मीठ

7) काळा मसाला साहित्य - 3 तमालपत्र, 2 चमचे जिरे, ४ विलायची, सात-आठ काळी मिरे, 3 मसाला वेलच्या, चार-पाच लवंग, एक दालचिनीचा तुकडा, एक काश्मिरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, दोन चमचे धणे पावडर, दोन चमचे बारीक किसलेल खोबरं, एक चमचा तिळ आणि एक चमचा खसखस १ लिंबाचा रस, अर्धा चमचा कसूरी मेथी, आले लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर

*चिकन हंडीची कृती:

  • स्वच्छ धुतलेल्या चिकन मध्ये अंदाजे मीठ, हळद, लिंबाचा रस टाकून ते चिकन चांगले एकजीव करुन घ्यावे.

  • नंतर ते चिकन झाकण ठेवून अर्धा तास मुरत ठेवावे.

  • नंतर गरम मसाले भाजून घेऊन एका तव्यात तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, काळी मिरे, मसाला वेलच्या, हिरव्या वेलच्या, जिरे आणि लवंग घालून मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत.

  • नंतर खोबरं तिळ आणि खसखस हे देखील भाजून घ्यावे.

  • भाजतांना मसाला जळणार नाही यांची खबरदारी घ्यावी.

  • थंड सगळा मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यावा.

  • नंतर चिकनच्या दुसऱ्या मॅरिनेशनसाठी चिकनवर ही तयार केलेला खडा मसाला पावडर, लाल मिरची पूड, धणे पावडर, आणि दही घालावे व नीट एकत्र करून घ्यावे. चिकन झाकून या मॅरिनेशनमध्ये 1 तास फ्रिजमध्ये ठेवावे.

  • आता एका तासानंतर चिकन बनवण्यास सुरुवात करू या. एका मातीच्या हंडीत म्हणजे मडक्यात आपल्या अंदाजाने तेल टाकावे .

  • तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा खरपूस परतला की त्यात आले लसणाची बारीक केलेली पेस्ट घालावी. तिचा ठसका कच्चेपणा निघून जाईपर्यंत ती पेस्ट परतून घ्यावी.

  • नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालून मॅरीनेट केलेले चिकन हळुवार पणे हंडीत सोडुन दयावे आणि गॅस थोडा वाढवुन चिकन चांगले परतून घ्यावे.

  • ५ मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालावी. आपल्या चवीनुसार मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे. नंतर झाकण घालून मंद आचेवर चिकन शिजू द्यावे.

  • दहा मिनिटांनंतर पुन्हा एकदा चिकन वर खाली करून घ्यावे. अंदाजे 25 मिनिटांत चिकन चांगले शिजते.

  • जर तुम्हाला रस्सा घट्ट हवा असेल तर झाकण काढून चिकन थोडा वेळ शिजवून जास्तीचे पाणी सुकू द्यावे. आता यात भाजलेली कसूरी मेथी पावडर घालून मिसळून घ्यावी. गॅस बंद करावा. अशारितीने आपली चिकन हंडी तयार झालेली आहे. हे चिकन तुम्ही भाकरी, पोळी, भात या सोबत खाऊ शकता.

टिप - आपण या चिकनहंडीच्या रेसिपीत शिजायला पाणी घातलेले नाही. कारण हळद, मिठ, दही यामुळे चिकनला पाणी आणि तेल दोन्ही मुबलक प्रमाणात सुटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT