Tandalachi Kheer Recipe esakal
फूड

Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

प्रदोष हा महादेवांनी आपल्यावर कृपा ठेवावी म्हणून अनेक लोक करतात

सकाळ डिजिटल टीम

Tandalachi Kheer Recipe : सोमप्रदोषाला अनेकांचा उपवास असतो, प्रदोष हा महादेवांनी आपल्यावर कृपा ठेवावी म्हणून अनेक लोक करतात; त्यात जर सोमप्रदोष असेल तर त्या दिवशी महादेवांना अनेक लोक मंदिरात जातात, त्यांना दुधाचा अभिषेक करतात, उपवास करतात. अशात तुम्हीही त्यांना तांदळाची खीरीचा नैवेद्य दाखवून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतात.

शिवाय घरीही काहीतरी गोड बनवलं जाऊ शकत. तांदळाची खीर बनवायला खूप सोपी आणि घरात प्रत्येकाला आवडेल अशीच असते आणि अगदीच काही मिनिटात तयारही होते. बघुया तांदळाच्या खिरीची रेसिपी

साहित्य:

- १ लिटर घट्ट सायीचे दूध (फुल्ल क्रीम दूध / म्हशीचे)

- अर्धी वाटी = १२५ ग्रॅम्स बारीक दाण्याचा तांदूळ (आंबेमोहोर, किंवा इंद्रायणी किंवा बासमती तुकडा)

- पाऊण कप = १८० ग्रॅम्स साखर (अधिक गोड आवडत असल्यास साखर थोडी वाढवली तरी चालेल)

- ५-६ मनुका

- ५-६ काजूचे तुकडे

- ५-६ चारोळी

- अर्धा टीस्पून वेलची पावडर

- पाव टीस्पून जायफळ

- तूप

कृती:

१. तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन एका चाळणीत किमान ३० मिनिटे निथळत ठेवा. नंतर पाणी निघून गेले की मिक्सरमधून फिरवून त्याची जाडसर पावडर करून घ्यावी. खलबत्त्यात किंवा पाट्यावर रवाळ वाटले तर उत्तमच!

२. एका पातील्यात १ लिटर दूध तापवत ठेवा. दुधाला उकळी आली की आच मंद करा आणि एकदा तळापासून दूध ढवळून घ्या.

३. एका मोठ्या जाड बुडाच्या कढईत दोन चमचे तूप टाकून त्यात वाटलेले तांदूळ घालून छान परतवून घ्या. आता त्यात हे दूध घाला आणि नीट ढवळा म्हणजे तांदळाच्या गुठळ्या पडणार नाहीत. मंद आचेवर तांदूळ दुधात शिजवून घ्यावे. मधून मधून दूध ढवळत राहा आणि कढईच्या कडांना लागलेली साय दुधात घाला म्हणजे खीर चांगली दाट होते .

४. खीर शिजतेय तोवर बाजूला एका छोट्या पॅनमध्ये १-२ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात चारोळ्या, काजू आणि मनुका एकामागोमाग एक परतून घ्याव्या. चारोळ्या आणि काजू खरपूस होई पर्यंत आणि मनुका फुलेपर्यंत परतवा.

५. साधारण १०-१२ मिनिटांत खीर चांगली दाट होते, आता त्यात साखर घालून ढवळून घ्या. साखर घातल्यावर थोडे पाणी सुटते. ते आटवायला अजून अजून ७-८ मिनिटे खीर मंद आचेवर शिजवून घेऊ .

६. आता सरतेशेवटी तुपात परतलेला सुका मेवा, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून नीट ढवळून घ्या. खीर तयार आहे. गॅस बंद करून झाकून ठेवा.

७. हलकी गरम किंवा कोमट खीर तुम्ही पुऱ्यांसोबत सर्व्ह करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT