VEGETABLE NOODLE SOUP sakal
फूड

Soup Recipe : हिवाळ्यात खा गरमा गरम यम्मी व्हेजिटेबल नूडल सूप

व्हेजिटेबल नूडल सूप कसं बनवायचं, जाणून घ्या रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

हिवाळा म्हटलं की नेहमी हेल्दी अन् पौष्टीक असं खावंस वाटतं. अनेकजण हिवाळ्यात गरम गरम सूप पितात. लहान मुलांना तर सूप प्रचंड आवडते. आज आपण एक आगळं वेगळं सूप कसं बनवायचं या विषयी जाणून घेणार आहोत.

सूप हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण आपण व्हेजिटेबल नूडल सूप कसं बनवायचं, याची रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य :

  • १ चमचा आले-लसूण बारीक चिरलेले

  • १ छोटा कांदा

  • १ छोटे गाजर

  • मुठभर घेवड्याच्या कोवळ्या शेंगा

  • ५-६ बेबी कॉर्न

  • ४-५ मशरूम

  • मूठभर पालकाची पाने

  • २ कांद्यांची पात (हे सारे बारीक चिरून)

  • १०० ग्राम पनीरचे तुकडे

  • सोया सॉस

  • चिली सॉस

  • तेल

  • कोबी-फ्लॉवर-घेवडा आदी घरात असतील त्या भाज्या

  • नूडल्स (शक्यतो राईस नूडल्स)

कृती :

  • थोड्या तेलावर बारीक चिरलेले आले-लसूण आणि कांदा परता.

  • त्यात सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा थोडे परता.

  • त्यात दोन पेले व्हेजिटेबल स्टॉक घाला.

  • सूप उकळत आल्यावर त्यात अर्धा चमचा पांढऱ्या तिळाची पेस्ट, थोडा सोया सॉस आणि थोडा चिली सॉस घाला.

  • वरुन चिरलेले पनीर, कांद्याची पात आणि नूडल्स घाला.

  • एक उकळी काढा.

  • सूप अधिक तिखट हवे असल्यास शेजवान सॉसही घालू शकता. थंडीच्या दिवसांत गरमागरम सूपची चवच न्यारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT