Tawa Pulao Recipe Esakal
फूड

Sunday special: हॉटेलपेक्षा भारी आणि चवदार ; तवा पुलाव बनवा घरच्या घरी

सुट्टीच्या दिवशी काही तरी हटके रेसिपी झालीच पाहिजे, असा प्रत्येकाचा आग्रह असतो.

दिपाली सुसर

Tawa Pulao Recipe: सुट्टीच्या दिवशी काही तरी हटके रेसिपी झालीच पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह असतो.म्हणून आम्ही आज खास तुमच्यासाठी हॉटेलपेक्षा भारी आणि चवदार लागणारा तवा पुलाव घरच्या घरी कसा तयार करायचा याची रेसिपी घेऊ आलो आहोत.

चला तर मग बघू या तवा पुलाव रेसिपी..

साहित्य :

दोन वाटी बासमती तांदूळ

चार वाटी पाणी

बटर एक चमचा

चार मिरे, चार लवंगा, एक तमालपत्र

पावभाजी मसाला एक चमचा

व्हेज बिर्याणी मसाला एक टी स्पून

एक कांदा (उभा चिरलेला)

दोन बटाटे (उकडलेले)

दोन सिमला मिरची (उभी चिरलेली)

दोन गाजर (उभे चिरलेले)

वटाणे

आलं, लसूण पेस्ट एक चमचा

मीठ

तूप

कोथिंबीर

कढीपत्ता

कृती :

सर्वप्रथम चार वाटी पाणी उकळत ठेवा. आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर कुकरमध्ये थोडेसे बटर घेऊन त्यात मिरे, तमालपत्र, लवंग परतून घ्या. आता त्यात धुवून निथळलेले तांदूळ टाका आणि मीठ घालून ते एखादा मिनिट परतून घ्या. तांदूळ परतल्यावर त्यात गरम पाणी घाला आणि दोन शिट्ट्या घेऊन गॅस बंद करा.

गॅस बंद केल्यावर अगदी दोन मिनिटात शिट्टी करून भात मोठ्या परातीत टाकून पसरवून घ्यावा.

आता मोठ्या लोखंडी कढईत तूप किंवा बटर टाका. तूप तापलं की त्यात आलं, लसूण पेस्ट , कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. नंतर सगळ्या भाज्या टाकून त्या भाज्या परतवून घ्याव्या.

भाज्या शिजत शिजत आल्या की मग त्यात बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला घालून हे मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर आपल्या अंदाजानुसार मीठ घालावे

सगळ्यात शेवटी भात टाकून हलवून घ्यावा. नंतर दणदणीत वाफ आणून कोथिंबीर घालावी आणि सर्व्ह करा तवा पुलाव.

टिप: भाताची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी, हलक्या हाताने किंवा दोन चमच्यांनी परतावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant VS Narayan Rane : उदय सामंतांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर नारायण राणेंचा इशारा; कोकणात वाढली राजकीय खळबळ

Fatty Liver: तुमचं लिव्हर फॅटी आहे की नाही, घरबसल्या ओळखा; डॉक्टर सरीन यांनी सांगितल्या ट्रिक्स

Latest Marathi News Live Update : SRA ची मोठी कारवाई! मुंबईत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Corruption Case : हॉस्पिटल ते स्मशानभूमी, सगळीकडे मागितली लाच; मुलीच्या मृत्यूनंतर निवृत्त अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा धक्कादायक अनुभव

IND vs AUS 2nd T20I Live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा काय बदल झाला! अर्शदीपला मिळाली का संधी?

SCROLL FOR NEXT