फूड

घरीच तवा व्हेज रेसिपी कशी बनवावी; जाणून घ्या

मान्सूनच्या या विशेष रेसिपी बद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

स्नेहल कदम

वातावरण बदलेल की आपल्या खाण्यातही बरेच बदल होतात. वातावरणानुसार वेगळ्यावेगळ्या चवीच्या रेसिपी खाण्याला अनेकजण पसंती देतात. पासाळ्याच्या दिवसात चटपटीत, गरमागरम आणि तिखट खावे असे वाटतं राहते. कारण वातावरणात गारवा असतो. यावेळी पाऊस आणि चहा, कॉफी किंवा गरम भजी असे अनेक पदार्थांचे कॉंबिनेशनला अनेकजण पसंती देतात. खुसखुशीत चकली, शेवचिवडा असेल तर मग अजून गप्पांच्या मैफीलीला रंग चढतो. याशिवाय काही चटपटीत गरम पदार्थांनाही आपण खास पसंती देतो. यामधील एक फेमस डीश म्हणजे तवा रेसिपी. परंतु अनेक लोक या रेसिपीचे फॅन आहेत. मात्र ही रेसिपी घरी कशी बनवावी याबद्दल अनेकांना माहित नाही. मान्सूनच्या या विशेष रेसिपी बद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य -

  • 1 चमचा मेथी पाउडर

  • 2 चमचा चाट मसाला

  • 2 चमचे लाल मिरची पाउडर

  • 1.5 चमचा धने पाउडर

  • 1/2 हींग

  • 1 चमचा जीरे पाउडर

  • 1 चमचा सौफ पाउडर

  • 1/2 चमचा हळद पाउडर

  • 1/2 चमचे गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

  • तेल

  • 3 मोठे बटाटा

  • 10-15 भेंडी

  • 6-7 छोटी वांगी

  • 3 कारली

  • 4 टोमॅटो

  • 2 हरवी मिरची

  • आलं

  • 2-3 चमचे कोथंबिर

  • 2-3 चमचा बटर

कृती -

  • सुरुवातीला सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर फ्राय करणाऱ्या भाज्या एकत्र करून घ्या आणि यात कारल्याचा वापर करणार असाल तर त्याला थोड्या वेळासाठी मीठ लावून बाजूला ठेवा. बटाट्यांना उकळून घेऊन दोन हिस्स्यांमध्ये कापून ठेवा.

  • यानंतर चार टोमॅटो, आलं, हिरवी मिरची यांची एकत्र पेस्ट तयार करून घ्या. एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यामध्ये हिंग, हळद पावडर, धणे पावडर, लाल तिखट घालून हा मसाला एकत्र चांगला शिजू द्या.

  • यानंतर तव्यावर तेल किंवा बटर गरम करून त्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या परतवून घ्या थोड्या वेळासाठी ते तसेच राहूद्या. त्यानंतर या भाज्यांमध्ये टोमॅटो पेस्ट घाला.

  • आता या तयार मिश्रणाला त्या तव्यावर दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू द्या यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर, थोडेसे चीज घालून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवार गटाने अखेर भाकर फिरवली....जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, नवा प्रदेशाध्यक्षही ठरला!

अमृता सुभाषची 'फसवणूक'? ब्लॅक पेजवरील पोस्टने चाहते संभ्रमात! म्हणाली, 'याबद्दल बोलूच पण...'

Latest Marathi News Updates : जयंत पाटील यांनी दिला 'राष्ट्रवादी'च्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

"म्हणून शोमधून मी बाहेर पडले" इंडियन आयडॉलमधून काढण्याबद्दल मिनी माथुरचा धक्कादायक खुलासा; "खोट्या.."

जेव्हा मनीषा कोईरालाच्या 'त्या आरोपांनी ऐश्वर्या रायला बसलेला धक्का; धाय मोकलून रडलेली अभिनेत्री, नंतर...

SCROLL FOR NEXT