Healthy Low Calorie Breakfast:  esakal
फूड

Healthy Breakfast: हेल्थ भी टेस्ट भी! चहा बरोबर ट्राय करा हे टेस्टी स्नॅक्स

उठल्यावर काहीही अरबट चरबट खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते शिवाय पोटदुखीचाही त्रास होऊ शकतो. याने आपले वजन देखील वाढू शकते.

Lina Joshi

Healthy Low Calorie Breakfast: सकाळी सकाळी खूप भूक लागते, उठल्यावरती पोटात काय टाकावं आणि काय नाही असं होत असतं. अर्थात का होवू नये, रात्रभर आपण काहीच खात नाही त्यामुळे उठल्या उठल्या भूक लागणं स्वाभाविक आहे. पण उठल्यावर काहीही अरबट चरबट खाल्ल्याने अॅसिडिटी होऊ शकते शिवाय पोटदुखीचाही त्रास होऊ शकतो. याने आपले वजन देखील वाढू शकते.

उठल्या उठल्या शरीराला आवश्यक पोषकतत्वे दिली तर दिवसभराची एनर्जी आपल्याला मिळते. दिवसभर याने आपल्याला उत्साही वाटते आणि झोप येत नाही. अशात नक्की काय खावं असा प्रश्न पडला आहे? आधी तर बिस्किट खाणं बंद करा. याने तुम्हाला फक्त पित्ताचा त्रास होईल.

भाजलेले चणे, काकडी, फ्रूट सॅलड आणि बरेच काही हे सर्व उत्तम पर्याय आहेत ज्यात कॅलरी कमी आणि पोषण जास्त आहे. हे आरोग्यदायी पर्याय निवडून, तुम्ही दोषी न वाटता तुमच्या चहाच्या वेळेचा आनंद घेऊ शकता आणि तुमचे वजन कमी करणे किंवा आरोग्याची उद्दिष्टे पूर्ण करु शकता.

1. भाजलेले चणे: चणे हे प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. चण्यांना धुवून टाका. आता ओव्हनमध्ये 25-30 मिनिटे 400°F (200°C) कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. थोडे मीठ भुरभुरा आणि अतिरिक्त चवीसाठी मसाले टाका.

2. काकडी सॅलड: बिस्किट खाण्या ऐवजी बारीक चिरलेल्या काकड्या वापरा हवं असेल तर त्या लो फॅट्स असलेले क्रिम चीज टाका. हे एक फ्रेश आणि लो-कॅलरी स्नॅक बनते.

3. एअर-पॉप्ड पॉपकॉर्न: एअर-पॉप्ड पॉपकॉर्न हा लो-कॅलरी असलेला परफेक्ट पदार्थ आहे. अधिक चवसाठी दालचिनी किंवा मिरची पावडर सारख्या मसाल्यांनी याला तयार करा. बटर किंवा इतर हाय-कॅलरी टॉपिंग्ज टाकणे यात शक्यतो टाळा.

4. गाजराच्या चकत्या: छान गाजर सोलून घ्या, आता त्याचे काप करा आणि त्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरा. एका छोट्या वाटीत मेयोनीज बरोबर सर्व्ह करा. गाजर ही कमी उष्मांक असलेली फळभाजी आहे जी पोषक तत्वांनी भरलेली असते, तर मेयोनीज हे प्रथिनेयुक्त डिप असते.

5. फ्रूट सॅलड: तुमची आवडती फळे कापून घ्या आणि छान प्लेट तयार करा. फळं खाणं कधीही हेल्दी ठरत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT