चहा 
फूड

चहाची चव वाढविण्यासाठी 'या' दहा घटकांचा केला जातो वापर

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - भारतात चहा पिणे ही सर्वसामान्य बाब आहे. बऱ्याच जणांसाठी चहा हे गप्पा मारण्यासाठीचे प्रमुख निमित्त असते. मात्र, काही वेळेस चहामध्ये योग्य घटक न टाकल्यास चहाची तलफ भागत नाही. तुम्हाला माहिती आहे का, की दूध, साखर, चहा पावडर, पाणी, अद्रक या व्यतिरिक्तही १० असे घटक आहेत जे चहात टाकले जाऊ शकतात? तर मग जाणून घेऊयात, हे घटक कोणते आहेत...

१. केसर

केसरचा चहा खूपच प्रसिद्ध आहे. त्याचे फायदेही आहेत. केसरच्या वापराने चहाची चव दररोजच्या पेक्षा वेगळी लागते. तुम्ही एकदा चहामध्ये केसर टाकून प्या. कदाचित तुम्हाला त्याचीच सवय लागण्याची शक्यता जास्त आहे.

२.स्टार एनिस

घसा खवखव करत असेल तर स्टार एनिस चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही त्याचा दररोजच्या चहामध्ये वापर करु शकता.

३. दालचिनी

दालचिनीच्या चहाची एक वेगळी चव असते. ती तुम्हाला आवडू शकते. विशेषतः थंडीत या चहाची चव भारी लागते. मात्र चहा बनवताना हे लक्षात ठेवा की चहात ती जास्त टाकू नका.

केसर

४. हळदी

ज्या प्रमाणे हळदीचे दुध आरोग्यदायी असते. तसेच हळदीवाला चहादेखील आरोग्यदायी असतो. हा चहा खूप स्वादिष्ट लागतो. जर तुम्हाला जास्त सर्दी झाली असेल किंवा खराब हवामानामुळे त्रास होत असेल तुम्हाला हा चहा नक्कीच चांगला लागेल.

५. लवंग

सर्दी, खोकला, डोकेदुखीत हा चहा फायद्याचा असतो. लवंगचा वापर खूप वेळेस केला जातो. लवंगाने चहात कडक चव येते. ती तुम्हाला आवडू शकते. मात्र चहात कधीच जास्त लवंग टाकू नका.

६. पुदिना

जर तुम्ही बिना दुधाचा चहा बनवत असाल तर पुदिन्याचा वापर करुन पाहा. या चहाने ताजेपणाच नव्हे तर चांगले फ्लेवर मिळेल. लिंबू आणि पुदिन्याची चहा बऱ्याच लोकांना आवडते. आईस-टीमध्ये तर पुदिना महत्त्वाचा घटक असतो.

७. इलायची

इलायचीची चव अद्रकबरोबर जास्त चांगले लागते. मात्र जास्त इलायची टाकू नका. तुम्हाला गोड चहा आवडत असेल तर १ पेक्षा जास्त टाकू नका. इलायची तुमच्या चहामध्ये हर्बवाला फ्लेवर आणेल आणि चहाची चव वाढेल.

८. गुळ

साखरेच्या तुलनेत नेहमी गुळाचा चहा जास्त आरोग्यदायी असते. मात्र जास्त गोड खाणेही चांगले नसते. त्यामुळे लक्ष ठेवा. गुळाच्या चहात तंदूर फ्लेवर येतो. या चहाची चव साखरेच्या तुलनेत फार वेगळी असते.

९.काळी मिरची

जर तुमचा घसा खराब असेल तर काळी मिरचीवाला चहा खूप फायद्याचा ठरू शकतो. हा चहा तुम्हाला थंडीत किंवा पावसाळ्यात प्यायला हवा. उन्हाळ्यात या चहाने त्रास होऊ शकतो. मात्र ऋतुनुसार तुम्ही घेऊ शकता.

१०. काळे मीठ

जर तुम्ही एकाच दिवशी फार बोलले, आवाज दाबला गेला किंवा आवाज बसला असेल तर काळ्या मीठाचा चहा तुम्हाला चांगला वाटेल. तुम्ही तो जरुर घ्या, तुम्हाला रिझल्ट दिसेल.

हे सर्व घटक चहात टाकले जातात. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही घटकापासून त्रास होत असेल ते मानवत नसेल तर ते वापरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT