French Fries Effect On Body esakal
फूड

French Fries खाण्यामुळे शरीरावर होतात पाच परिणाम!

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने याविषयी अभ्यास केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

फ्रेंच फ्राईज हा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वाचा अतिशय आवडीचा पदार्थ. कुठेही फिरायला गेल्यावर, हॉटेलमध्ये हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. एकवेळ बटाटा (Potato) आवडत नाही पण फ्रेंच फ्राईज मात्र नक्की खाल्ले (Food) जातात. पण अशाने नियमित बटाटा मात्र खाल्ला जातो. सारखा बटाटा खाणं आरोग्यासाठी (Health) धोकादायक आहे. बटाटा आपल्या शरीरावर (Body) कळत नकळत वाईट परिणाम करत असतो. फ्रेंच फ्राईजचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात याविषयी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने सुमारे 4500 तरुणांवर अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार जे लोक आठवड्यातून 2 पेक्षा जास्त वेळा फ्रेंच फ्राईज खातात, ते लवकर दगावण्याचा धोका जास्त आहे, असा निष्कर्ष आहे. तसेच इतर पाच परिणामही सांगण्यात आले आहेत.

पोटाचा त्रास - फ्रेंच फ्राईजमध्ये खूप कॅलरीज असतात. त्यामुळए ते खाल्ल्यावर पचन प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेत खूप मंद होते. तसेच नियमित फ्रेंच फ्राईज खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय जुलाब, उलट्या आणि गॅस होऊ शकतात.

brain

मेंदूच्या समस्या - फ्रेंच फ्राईजमध्ये हायड्रोजनेटेड तेल आणि भरपूर ट्रान्स फॅट असते. ते मेंदूसाठी चांगले नसते. त्यामुळे अल्झायमरचा धोका वाढतो. तसेच स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वाढते.

रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम- फ्रेंच फ्राईजचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर लगेचच परिणाम होतो. काहीवेळा यातील अस्वास्थ्यकर जीवाणू आतड्यातील मायक्रोबायोमला नुकसान करतात. यामुळे तुमची रोगाशी लढण्याची क्षमता कमी होते.

Weight gain

हृदयाचे नुकसान- फ्रेंच फ्राईज नेहमी खात असल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो. जास्त तळलेले अन्न रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि 'ट्रिपल वेसेल्स डिसीज'सारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

वजन वाढते - फ्रेंच फ्राईजमध्ये कॅलरीज जास्त असतात. ते सारखे खाल्ल्याने कंबर रुंद होते, पोट वाढते तसेच लठ्ठपणाची समस्या उद्भवते. या समस्या टाळायच्या असतील तर जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Reel star Akkya Bansode: “थांब, तुझा आज गेमच करतो...” पुण्यात रिल स्टारवर धारधार शस्त्राने कसा झाला हल्ला, कोण आहे अक्क्या बनसोडे?

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

SCROLL FOR NEXT