मिश्र धान्याचे पौष्टिक लाडू esakal
फूड

चार प्रकारचे लाडू खा, थंडी पळवा

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक पदार्थ खाणे फायद्याचे ठरते.

सकाळ डिजिटल टीम

थंडीच्या काळात पौष्टिक पदार्थ (Healthy Food) खाल्ल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. यासाठी थंडीत घरोघरी विविध प्रकारचे लाडू (Ladoo) तयार होतात. ते लाडू खाल्ल्याने थंडीपासून संरक्षण तर मिळतेच, शिवाय पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने पोटही भरते. त्यामुळे थंडीत लाडू खावेतच.

डिंक लाडू

डिंकाचे लाडू

डिंकाचे लाडू हाडे मजबूत होण्यासाठी फायदेशीर ठरतात. हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. डिंक लाडू शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. हिवाळ्याच्या हंगामात डिंकाचा लाडू खाल्ल्यास सांधेदुखी दुर होते. तसेच सांध्यातील स्नायू मजबूत होतात. डिंकचे लाडू बद्धकोष्ठताअसलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.

AALIV LADOO

आळीवाचे लाडू

आळिवात प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, 'क' व 'ई' जीवनसत्त्वही आहे. तसेच आयर्न भरपूर प्रमाण असते. ह्याच्या सेवनाने रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तसेच एनिमियाची तक्रार दूर होते. गर्भवती महिलांच्या डिलिव्हरी नंतर आळीवाचे लाडू किंवा खीर खाण्यास दिली जाते.

ladoo

मेथीचे लाडू

कणीक, साखर, तूप, सुकामेवा या पदार्थांबरोबर मेथी घालून मेथीचे लाडू केले जातात. थंडीच्या दिवसात सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसांत लहान मुलांना अशा लाडूंच्या सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. त्यामुळे हिवाळ्यात हे लाडू खाल्ल्याने फायदाच होतो.

तिळ लाडू

तिळाचा लाडू

तीळ हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवतात व कडाक्याच्या थंडीपासून आपला बचाव करतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात तिळाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT