tips of food for late time young person eat healthy food in kolhapur 
फूड

खुप दिवस तरुण राहायचं आहे ? तर मग डायटमध्ये या पाच गोष्टींचा समावेश करावाचा लागेल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सगळ्यांना वाटतं की आपण शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहायला हवं. प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपण खुप काळापर्यंत चिरतरुण दिसयला हवं. यासाठी वयोमानानुसार आपण आहाराविषयी काळजी घेतली पाहिजे. त्वचेची योग्य वेळी योग्य काळजी घेतली नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते. किंवा इतर त्वचेच्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.

या सुरकुत्यांमुळे चेहऱ्याची सुंदरता कमी होते. यांसारख्या काही समस्यांपासून सुटकारा पाहिजे असेल तर आपल्या आहारात पोषक तत्वांचा समावेश केला पाहिजे. बरेच लोक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले  प्रोडक्ट्स वापरतात. परंतु चेहऱ्यावर अशा प्रोडक्ट्सचा अतिवापर झाल्यास त्वचा खराब होण्याची शक्यता असते. असे प्रोडक्ट्स त्वचेला बाहेरून हानी पोहचवू शकतात. परंतु सकस आहारामुळे आपण मानसिक आणि  शारीरिकरित्या आरोग्यदायी राहतो. थोडक्यात काय तर आपल्या आहाराचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. चला तर आज आपण अशा सकस आहाराबद्दल चर्चा करूयात. आपल्या आरोग्याची काळजी घेवूया, यामुळे अधिक काळापर्यंत चिरतरुण राहण्यासाठी मदत होऊ शकते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांचे सेवन हे आरोग्यासाठी फायद्याचे असते. जसे की आपल्याला माहित आहेच पालक, ब्रोकली यामध्ये पोषकतत्वांचे प्रमाण तुलनेत अधिक असते. यामध्ये फक्त विटामिन्स किंवा मिनरल्स नसुन अॅंटीएक्सीडेंट आणि अॅंटीइन्फ्लेमेटरी अशीही गुणतत्वे असतात. ज्यामुळे त्वचा अधिक काळापर्यंत सुंदर आणि चिरतरुण राहायला मदत होते.

टोमॅटो 

टोमॅटो ही अशी फळभाजी आहे की, ज्याचा दररोज आपल्या स्वयंपाकामध्ये वापर केला जातो. चिरतरुण राहण्यासाठी टोमॅटो मदत करतो असे मानले जाते. यामधील लायकोपीन हे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेला होणारी बाधा टाळण्यासाठी मदत करते.
 
डाळिंब 

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी डाळिंबाचा वापर केला जातो. परंतु आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की, त्वचेची चमक वाढवण्यासाठी डाळिंबाचा उपयोग होतो. कारण यामध्ये विटामिन्स आणि एंटीऑक्सीडेंट असतात. जे सुर्यकिरणांपासून आपले रक्षण करतात आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

डार्क चॉकलेट 

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवनॉल्स असतात, ज्याला एंटीऑक्सीडेंट असे म्हटले जाते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपली त्वचा खूप वेळपर्यंत तरुण दिसते. डोक्याला शांत ठेवण्यासाठी ही चॉकलेटचा वापर केला जातो.

अवोकाडो 

अवोकाडोमध्ये आवश्यक असे विटामिन ए व विटामिन ई असतात. जे त्वचा स्वस्थ ठेवण्यास मदत करतात. आपल्या वयापेक्षा कमी वय दाखवण्यासाठीही याची मदत होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT