फूड

चटपटी 'टोमॅटो चटणी'सोबत पराठेचा आनंद घ्या

सकाऴ वृत्तसेवा

पुणे : ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला पुरी, कचोरी किंवा पराठा मिळाला तर मजा येते. जर त्यात मसालेदार बटाटा करी किंवा मसालेदार टोमॅटो चटणी असेल तर ते सोने पर सुहागाच. टोमॅटोची आंबट-गोड चटणी आरोग्यासाठीही चांगली असते. ही चटणी खूप चवदार लागते. ही चटणी खायलाच चांगली नाही तर बनवण्यासही सोपी आहे.

साहित्य:

टोमॅटो - 1 किलो

गूळ - 250 ग्रॅम

बडीशेप - 1 टीस्पून

तेल - 1 टेस्पून

हळद - चिमूटभर

लाल तिखट - १ टिस्पून

व्हिनेगर - टीस्पून

चाट मसाला - टीस्पून

मीठ - चवीनुसार

काळी मिरी - चवीनुसार

कृती:

-सुरवातीला तुम्हाला टोमॅटो पाण्याने स्वच्छ करावे लागतील आणि नंतर ते बारीक चिरून घ्या.

- आता एक कढई घ्या आणि तेल गरम करा.

- तेल गरम झाल्यावर त्यात बडीशेप किंवा जिरे देखील वापरू शकता.

- यानंतर, पॅनमध्ये चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो थोडावेळ पॅनमध्ये ठेवा आणि नंतर त्यात हळद, लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि मिरपूड घाला. हे मिश्रण चांगले शिजू द्या.

- त्यानंतर गूळ घाला. तुम्ही गुळाबरोबर थोडेसे पाणी घालू शकता, ज्यामुळे गुळ लवकर वितळण्यास सुरवात होईल.

- गूळ वितळला की चटणी घट्ट होईल आणि पाणी कमी होईल. असे झाल्यावर चटणीमध्ये व्हिनेगर घाला. त्यानंतर आणखी काही वेळ शिजवा.

- चटणी शिजल्यावर कोथिंबीरने सजावट करू शकता.

- तयार टोमॅटो चटणी गरम गरम पराठा किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT