food sakal
फूड

पावसाळ्यात नाश्त्यात गरम गरम हेल्दी शेंगोळे ट्राय करा, जाणून घ्या रेसिपी

चला तर मग जाणून घेऊया आता शेंगोळे कसे तयार करायचे??

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. अशात नाश्त्याला काहीतही गरम गरम खावंस वाटतं. यात पावसाची झड चालू की मग हमखास शेंगोळ्यांची आठवण येऊ लागते. शेंगोळयांच नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग बघूया आता शेंगोळे कसे तयार करायचे?

शेंगोळे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

1) तीन वाट्या कुळथाचे पीठ

2) पाव वाटी गव्हाचे पीठ

3) पाव वाटी शेंगदाण्याचे कूट

4) लसुन पेस्ट

5) तिखट दोन चमचे

6) हळद व हिंग अर्धा चमचा

7) चार वाट्या पाणी

8) चार चमचे तेल

9) चवीनुसार मीठ

कृती :

सर्वप्रथम परातीत कुळीथ व गव्हाचे पीठ, लसूण पेस्ट, एक चमचा तेल, हळद, हिंग, चवीनुसार तिखट व मीठ टाकून थोडेसेच कोमट पाणी घालून पिठ घट्ट मळून घ्यावे. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे तयार करुन घ्यावे.

नंतर कढई मध्यम आचेवर ठेवून त्यात तेल घालावे. तेल कडक तापल्यावर मोहरी, हिंग, हळद व चमचाभर तिखट घालून फोडणी दयावी. नंतर त्यात शेंगदाण्याचे कूट घालून चांगले परतून घ्यावे. दोन-तीन मिनिटाने मग त्या फोडणीत कोमट पाणी ओतावे व पाण्याच्या अंदाजाने मीठ घालून एक खरपूस उकळी आणावी.

उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने उकळीच्या पाण्यात सोडावेत. साधारण दहा ते बारा मिनिटात शेंगोळे चांगले शिजतात. शेंगोळे शिजले की नाही याचा प्राथमिक अंदाज घेण्यासाठी बोटाने ते दाबून पाहावे. नंतर मग तुम्हाला आवडत असेल तर त्यात दोन चमचे तूप घालून ढवळून झाकण ठेवावे. आचेवरून काढून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT