Pickle Making Tips esakal
फूड

Pickle Making Tips : लोणचे बनवण्यासाठी कोणते तेल वापरावे म्हणजे लोणचे टिकेल?

भाज्यांसाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. त्याचे कोणतेही तोटे शरीराला नाही

सकाळ डिजिटल टीम

Pickle Making Tips : उन्हाळा आला की आई घरात भरपूर लोणचे बनवून ठेवते. मात्र काही काहींना हे लोणचे टिकावायचे कसे ते अजूनही माहिती नाही. काही जण सरसोचे तर काही जण फल्लीचे तेल लोणच्यात टाकतात. चला तर लोणच्यासाठी नेमके कोणते तेल वापरावे ते जाणून घेऊया.

लोणचे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे उत्तम तेल म्हणजे मोहरीचे तेल! हे केवळ सर्व घटकांचे स्वाद वाढविण्यात मदत करत नाही तर ते त्याच्या आरोग्य फायद्यांसाठी देखील ओळखले जाते. भाज्यांसाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. त्याचे कोणतेही तोटे शरीराला नाही.

मोहरी तेलाचे फायदे

हे तेल मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडने भरलेले आहे जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. तसेच त्याच्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांमुळे प्रतिकारशक्ती वाढवते आणि पचन तसेच हे तेल श्वसनमार्ग स्वच्छ करण्याचा एक उत्तम नैसर्गिक मार्ग आहे.

Pickle making Tips

मोहरीचे तेल हे खराब ठिसूळ नखांसाठी आणि ड्राय हेअरसाठीही वापरले जाते. मात्र अनेकांना हे माहिती नाही. व्हिटॅमिन ई समृद्ध, मोहरीच्या तेलाचा वापर सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी आणि सनस्क्रीन म्हणून केला जातो.

मोहरीचे तेल व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के ने भरलेले असते, त्यामुळे केस सुंदर आणि लांब दिसण्यासाठी या तेलाचा वापर करावा. (food)

तेव्हा इतर तेलांच्या तुलनेत लोणच्यासाठी मोहरीचे तेल वापरल्यास ते आरोग्यासाठीही चांगले असते आणि लोणचेही दीर्घकाळ टिकते.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT