Food Recipe  esakal
फूड

Food Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखा White Sauce Pasta

White Sauce बनवणे कठीण वाटत असल्याने घरी बहुतेकदा बनवायला सोपा red sauce Pasta बनवला जातो. आज तुम्हाला सांगणार आहोत सोपा आणि रेस्टॉरंटसारखा White Sauce Pasta बनवण्याची रेसिपी.

सकाळ डिजिटल टीम

जेव्हाही घरी पास्ता बनवण्याचा विषय निघतो तेंव्हा बनवायला सोपा red sauce Pasta बनवला जातो. White Sauce बनवणे कठीण वाटत असल्याने त्याकडे दूर्लक्ष केले जाते. White Sauce बनवताना त्यात कंसिंस्टंसी नाही येत अशी सामान्य तक्रार असते. पण आज आम्ही इथे White Sauce Pasta ची अशी परेक्ट रेसिपी घेऊन आलो आहोत कीं तुम्ही रोस्टॉरंट सारखा पास्ता बनवू शकाल.

साहित्य

  • उकळलेला पास्ता २ कप

  • मैदा २ टेबल स्पून

  • दूध २ कप

  • बटर २ टेबल स्पून

  • ड्राय हर्बस दीड चमचा

  • खिसलेले चीज अर्धा कप

  • बारिक चिरलेला लसूण २ टीस्पून

  • पातळ स्लाईसमध्ये चिरलेली हिरवी, पिवळी, लाल शिमला मिर्ची प्रत्येकी पाव कप

  • चिरलेली ब्रोकोली पाव कप

  • चिली फ्लेक्स १ टीस्पून

  • काळी मिरे पूड २ चिमूट

  • मीठ चवीनुसार

कृती

  • एका बाऊलमध्ये दूध, मैदा व मीठ घालून मिक्स करून घ्या. व बाजूला ठेवा.

  • एका नॉन स्टिक पॅनमध्ये बटर टाकून गरम करा.

  • मग यात लसूण टाकून काहीवेळ परतून घ्या नंतर त्यात सर्व शिमला मिर्ची टाकून मध्यम आचेवर २-३ मिनीट शिजवून घ्या. मग त्यात ब्रोकोली टाकून काहीवेळ अजून शिजू द्या.

  • मग यात तयार मिश्रण टाका. त्यावर चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्बज, चीज, मीठ टाकून नीट मिक्स करून घ्या. नंतर २-३ मिनीट शिजू द्या.

  • आता यात उकळलेला पास्ता मिक्स करा. मध्यम आचेवर २-३ मिनीट शिजू द्या.

  • तयार White Sauce Pasta ला प्लेटमध्ये घ्या आणि त्यावर काळी मिरे पूड घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT