carrot and radish spicy  
फूड

Winter Recipe: हिवाळ्यात गाजर आणि मुळ्याचं मसालेदार लोणचं खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा...

हिवाळ्यात बहुतेक लोक मुळा सॅलडच्या स्वरूपात खातात.गाजर आणि मुळ्याचे लोणचे डायबिटिससाठीही फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

carrot and radish spicy : हिवाळ्यात तुम्ही गाजर आणि मुळ्याची कोशिंबीर खाल्ली असेलच. हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अनेकजण गाजर, मुळ्याची भाजीही खातात. पण हवं तर गाजर आणि मुळ्याचं लोणचंही खाऊ शकता. गाजर आणि मुळ्याच्या लोणचे फायदे खूप चवदार आणि पौष्टिक आहेत. गाजर आणि मुळा यांचे मसालेदार लोणचेही तुम्ही घरी सहज बनवू शकता. हे लोणचं तुम्ही रोटी, पराठ्यासोबत खाऊ शकता.आजच्या लेखात आपण गाजर आणि मुळ्याच्या लोणच्याचे फायदे आणि ते कसे करायचे याची सविस्तर रेसिपी जाणून घेणार आहोत.

गाजरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळतात. यासोबतच यामध्ये साखर आणि सोडियम देखील असते. गाजर बीटा कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे.मुळा देखील पोषक तत्वांनी समृद्ध आहे. मुळा प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. याशिवाय मुळ्यात कर्बोदके, ऊर्जा, फायबर, फॉस्फरस आणि पाणी असते.

हिवाळ्यात बहुतेक लोक मुळा सॅलडच्या स्वरूपात खातात.गाजर आणि मुळ्याचे लोणचे डायबिटिससाठीही फायदेशीर आहे. त्यात पुरेशा प्रमाणात फायबर असते. यामध्ये असलेले घटक इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण जर रक्तातील साखरेची पातळी वाढली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे लोणचे घ्या.गाजर आणि मुळ्याच्या लोणच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि फ्लूमध्येही आराम मिळतोगाजर आणि मुळ्याचे लोणचे बनवायला अगदी सोपे आहे.

साहित्य:

गाजर

मुळा

मिरच्या

तेल

मोहरी

जिरे

मेथी

काळी मिरी

धणे

हळद मिरची पावडर

मीठ

ओवा

आमचूर पावडर

कृती:

सर्वप्रथम प्रथम गाजर, मुळा आणि मिरच्या चांगल्या प्रकारे धुवून कापडाने पुसून घ्या. त्यानंतर त्यांचे लांब तुकडे करा.

आता कढईत तेल गरम करा त्यात चिरलेल्या मिरच्या तळून घ्या.

यानंतर त्यात गाजर आणि मुळ्याचे तुकडे टाका. 4-5 मिनिटे शिजवा. आता त्याचा मसाला तयार करा. त्यासाठी मोहरी, जिरे, मेथी, काळी मिरी, धणे चांगले परतून घ्या.

भाजल्यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या.यानंतर भाजलेल्या गाजर, मुळा आणि मिरच्यांमध्ये हळद, मिरची पावडर, मीठ, ओवा, आमचूर पावडर घालून चांगले मिक्स करा.

आता त्यात वाटलेला मसाला घाला आणि हे सर्व चांगले मिसळा.

त्यानंतर थोडा वेळ शिजवा.आता हे तयार मसालेदार लोणचे तुम्ही संपूर्ण हिवाळ्यासाठी खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT