Carrot French Fries  Esakal
फूड

Winter Recipe: हेल्दी गाजर फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे तयार करायचे?

रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.

सकाळ डिजिटल टीम

सुरूवातीला बघू या गाजर खाण्याचे फायदे...

थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.

Carrot French Fries: गाजराचे सेवन तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. फ्रेंच फ्राईजच्या स्वरूपातही तुम्ही गाजर खाऊ शकता. ही एक खूप निरोगी आणि चवदार रेसिपी आहे. ही रेसिपी बनवायला देखील खूप सोपी आहे. गाजर फ्रेंच फ्राईज तुम्ही घरी सहज बनवू शकता. ते खायला खूप मसालेदार आणि कुरकुरीत असतात. तुमच्या मुलांना हे फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडतील. आजच्या लेखात आपण घरच्या घरी हेल्दी गाजर फ्रेंच फ्राईज कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

1) चार ते पाच गाजर

2) काळी मिरी पावडर

3) कॉर्न स्टार्च

4) चवीनुसार मीठ

5) तेल

कृती:

सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्यावे. त्यांना फ्राईजच्या आकारात कापून घ्या. यानंतर, त्यांना उकळलेल्या पाण्यात 3 मिनिटे उकळून घ्या. या फ्राईजला हलके उकडू द्या. यानंतर, त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि त्यांना थंड होऊ द्या.एका भांड्यात एक चमचा कॉर्न स्टार्च घ्या. त्यात टीस्पून काळी मिरी पावडर घाला. त्यात चवीनुसार मीठ घालावे. या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता या मिश्रणात उकडलेले गाजर टाकून त्याला छान कोट करा.आता कढईत तेल गरम करा. गरम तेलात हे फ्राईज तळून घ्या.

यानंतर तुम्ही हे गाजर फ्राईज टोमॅटो सॉससोबत खाण्यास देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

Viral Video: 'स्टॅन स्टॅन' बनून रिषभ पंतचा धमाका! न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबसाठी सिक्सचा पाऊस पाडत केलं अर्धशतक

Latest Marathi News Live Update: अशैक्षणिक कामे थांबवा, शिक्षकांना त्यांचे मूळ काम करू द्या!

Pune Crime : रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणाचा खून; आठ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT