aliwachi kheer  Esakal
फूड

Winter Recipe: हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारी अळीवाची खिर कशी तयार करावी?

डायरिया, कफ, अस्थमा या आजारांव अळीव फायदेशीर ठरतं.

सकाळ डिजिटल टीम

अळीवच्या बिया आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात. अळीवच्या बियांना काही लोक हलीम असंही म्हणतात. बऱ्याचदा बाळंपणात अथवा थंडीच्या दिवसांमध्ये अळीवचे लाडू केले जातात. अळीव पेज आणि मिठाईच्या पदार्थांमध्येही वापरले जातात. अळीवाने फक्त तुमचे वजन कमीच होते असं नाही तर नियमित अळीव आहारात असेल तर तुमचे वजन पुन्हा वाढतही नाही. अनेक आरोग्य तज्ञ्जही वजन कमी करण्यासाठी आहारात अळीव समाविष्ठ करण्याचा सल्ला देतात. हलीममुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते. ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शिवाय अळीवमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे वजन लवकर आणि योग्य पद्धतीने कमी होते आणि सोबत शरीराचे पोषणही होते.

अळीवाच्या बिया लालसर रंगाच्या आणि अंडाकृती आकाराच्या असतात. डायरिया, कफ, अस्थमा या आजारांव अळीव फायदेशीर ठरतं. कारण ते शक्तीवर्धक आणि पोषक असते. बाळंतपणानंतर अळी व खाण्यामुळे स्तनपान देणाऱ्या महिलांच्या दुधात वाढ होते. अळीवामुळे मधुमेह, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठता या सारख्या आरोग्य समस्या नियंत्रित राहतात. अळीवामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे अॅनिमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांना अळीवाचा चांगला फायदा होऊ शकतो. अळीव या तेलबिया असल्यामुळे त्यांच्या  सेवनाने अनेक त्वचारोगही बरे होऊ शकतात. मात्र ते उष्ण असल्यामुळे गर्भवती महिलांनी अळीवाचे सेवन करू नये कारण अळीवामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो.

साहित्य

कृती

एका वाटीत अळीव पाव कप दुधात भिजत घालावेत. बदाम आणि खारीक पावडर वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावेत. अळीव, खारीक आणि बदाम किमान दोन तास तरी भिजत ठेवावेत. दोन तासांनी अळीव चांगले फुलून येतील. तसेच खारीक बदामही चांगले भिजलेले असतील. बदामाची साले काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावे. दूध गरम करावे त्यात भिजवलेले अळीव घालावे. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर तिन ते चार मिनीटे शिजवावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि गरम गरम प्यावे. आवडीनुसार पिस्ता, काजू, बेदाणेसुद्धा खिरीत घालू शकतो.टीप:- अळीव भिजवताना चमच्याने निट ढवळावे. अळीव हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर / दुधावर तरंगतात आणि कधीकधी निट भिजत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT