guava Esakal
फूड

Winter Recipe: पारंपरिक पद्धतीने कच्चा पेरूची आरोग्यवर्धक भाजी कशी तयार करायची?

पेरू हे साधारण थंडीच्या दिवसात जास्त बघायला मिळतात, पेरू कापून त्यावर चाट मसाला लावून खाण्यास खूप चविष्ट लागते.

सकाळ डिजिटल टीम

Benefits of Guava: हिवाळ्यात फळांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पेरूचे देखील थंडीच्या दिवसात सेवन केल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा पोहोचतो. तसे बघायला गेले तर पेरू एक हंगामी पीक आहे. पेरू हे साधारण थंडीच्या दिवसात जास्त बघायला मिळतात, पेरू कापून त्यावर चाट मसाला लावून खाण्यास खूप चविष्ट लागते. पेरू पासून अनेक पदार्थ बनवले जातात जसे की पेरूची चटणी, लोणचे इत्यादी तसेच फिरू हा कच्चा देखील खाल्ला जातो.

पेरू हा सर्वप्रथम मध्य अमेरिकेत आढळून आला होता, पेरूची साल हिरवी तसेच फिकट पिवळ्या रंगाचे असते.पेरूचा आतील भाग म्हणजे पल्प हा सफेद, लाल किंवा गुलाबी रंगाचा असतो. आहार तज्ञांच्या मते, पेरू मध्ये अनेक विटामिन्स एंटीऑक्सीडेंट आणि लायकोपीन नावाचा घटक असतो, यामुळे आपल्या शरीरात रोग प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते, तसेच त्याचे सेवन केल्याने अनेक रोगांपासून वाचले जाऊ शकते. आजच्या लेखात आपण पारंपरिक पद्धतीने कच्चा पेरूची आरोग्यवर्धक भाजी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

1) एक कच्चा मोठा पेरू

2) भाजलेले शेंगदाणे

3) किसलेलं खोबरं

4) चिंचेचा कोळ

5) एक चमचा गोडा मसाला

6) दोन हिरव्या मिरच्या

7) आठ-दहा कढीपत्ता पाने

8) कोथिंबीर

9) मेथ्या

10) तीळ

11) जिरे

12) मोहरी

13) हळद

14) हिंग

15) तेल

16) चवीप्रमाणे मिठ

17) गुळाचा खडा

कृती:

पेरूच्या छोट्या-छोट्या चौकोनी फोडी करून घ्याव्या.तेल तापवून मेथ्या,तीळ,जिरे,मोहरीची फोडणी करून घ्यावी. हळद-हिंग-गोडा मसाला, हिरवी मिरची-कडीलींब घालावे. पेरूच्या फोडी घालून परतून घ्यावे.मिठ, गुळ, भाजलेले दाणे, खोबऱ्याचे काप घालून एक वाफ आणावी.चिंचेचा कोळ आणि पाव वाटी पाणी घालून एक उकळी आणावी नंतर त्यात कोथिंबीर घालावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान शेतात कोसळले, शेतकरी महिलांनी पाहिला थरार..

Pratik Yadav Death : किचनमध्ये बेशुद्ध, तातडीनं रुग्णालयात नेलं अन्...; अखिलेश यादवांच्या भावाचा मृत्यू कशामुळे? पोलिसांनी मोबाईल घेतला ताब्यात

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा प्रकरणात तक्रारी दिल्यास गुन्हे दाखल करू, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी याचं आवाहन

IFS Success Story: अहिल्यानगरचा सुशांत वडावकर IFS परीक्षेत देशात ३१ वा; आयआयटीनंतर मिळवले मोठे यश, मेहनत, जिद्द आणि मार्गदर्शनाचे यश..

Stock Market Today: तब्बल 4 दिवसांनी शेअर बाजार हिरवा! कोणते शेअर्स तेजीत? आज 'या' दिग्गज कंपन्यांचा तिमाही निकाल

SCROLL FOR NEXT