Landge Esakal
फूड

Winter Recipe: खान्देशातील पारंपरिक पदार्थ असलेले पौष्टिक लांडगे कसे तयार करायचे?

हा लांडगे पदार्थ खाण्यासाठी चांगला चविष्ट असल्यामुळे या परिसरात चांगला प्रसिद्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. सर्व भागांमध्ये काही खास पदार्थ मिळतात. हे पदार्थ त्यांच्यातील वेगळेपणानं त्या भागाची खास ओळख बनली आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्टय़ांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. अगदी प्राचीन काळापासून आतापर्यंत खांडववन, ऋषिक, दानदेश, स्कंददेश, कान्हदेश (खान्देश) अशा वेगवेगळ्या नावांनी हा भूप्रदेश ओळखला गेला आहे. ठसकेबाज शब्दसंपदेनं सजलेली अहिराणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल गावरान तसेच झणझणीत खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात लांडगे हा प्रसिद्ध खाद्य पदार्थ मिळतो. हा लांडगे पदार्थ खाण्यासाठी चांगला चविष्ट असल्यामुळे या परिसरात चांगला प्रसिद्ध आहे. आजच्या लेखात आपणपौष्टिक लांडगे कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.. 

साहित्य:

तुरडाळ एक वाटी 

चणा डाळ अर्धी वाटी 

मूगडाळ अर्धी वाटी

गव्हाचे पीठ एक वाटी

मोहरी

जिरे

तेल

हळद

मीठ

लाल तिखट

हिरवी मिरची

धने पूड

शोप

लसूण अद्रक पेस्ट

खोबरे कीस

कढीपत्ता

बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

सर्वप्रथम तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ व मुगाची डाळ चार तास पाण्यात भिजवणे. नंतर त्याला मिक्सर मधून रवाळ दळून घेणे. लसूण, हिरवी मिरची, अद्रक व जिरे यांची पेस्ट करणे व ती पेस्ट या डाळीच्या सारणात एकत्र करणे. चवीनुसार मीठ, हळद, चटणी, थोडीशी हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व पदार्थ त्या पेस्टमध्ये टाकून पेस्ट एकजीव करणे. नंतर बारीक चाळलेल्या पिठाला तेलाचे मोहन देणे. थोडेसे मीठ व हळद त्यात टाकून त्याची थोडी घट्ट अशी कणीक मळणे. त्या कणकेला पाच ते सात मिनिट झाकून ठेवणे. नंतर त्या पिठाचा थोडासा लहान गोळा घेऊन पोळी सारखी गोल पण बारीक पोळी लाटून त्यावर वरील डाळींचे सारण पसरवणे. थोडासा जाडसर थर देणे व त्याचा रोल तयार करणे. अशाप्रकारे आठ ते दहा रोल बनल्यानंतर त्यांना उकळत्या पाण्यावर वाफवण्यासाठी ठेवणे.

दहा ते पंधरा मिनिट वाफ दिल्यानंतर ते चांगल्यापैकी शिजून जातात. ते शिजल्यावर गॅस बंद करणे व गाळणीतील रोलमधील वाफ जाऊ देण्यासाठी बाहेर काढणे व वाफ निघून गेल्यानंतर त्याला पसरट भांड्यात काढून ठेवणे व त्याचे सूरीच्या साहाय्याने छोटे छोटे रोल कापणे.हे सर्व रोल कापले गेल्यावर फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवून त्यात मोहरी, तीळ, हिरवी मिरची टाकने. फोडणी पक्की झाल्यानंतर त्यात कापलेले रोल टाकने व फ्राय करणे. डीश मध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबऱ्याचा किस टाकून आपण ती डिश सजवू शकतो. व गरमागरम लांडगे खाण्याची मजाच वेगळी असते. अशाप्रकारे लांडगे तयार केले जातात या लांडग्यांना टोमॅटो सॉस किंवा घरगुती खोबऱ्याची चटणी सोबत आपण खाऊ शकतो. या लांडग्यांना बनवताना आपण डाळी भिजवून बनवल्यामुळे हा पदार्थ अधिक पौष्टिक बनतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT