Winter Recipe tomato soup  Esakal
फूड

Winter Recipe: घरच्या घरी बनवा अगदी रेस्टॉरंट सारखे चवदार टोमॅटो सूप...

टोमॅटोमध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते.

सकाळ डिजिटल टीम

हिवाळातील गुलाबी थंडी आणि त्यासोबत गरमा गरम टोमॅटो सूप...

हे वाचून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना. सूप प्यायची ईच्छा झाली की अनेकदा आपण बाजारातून पॅक केलेले तयार सूप आणतो पितो पण तरी मन भरतं नाही मग अशावेळी बाजारातून पॅक आणलेल्या सूपापेक्षा चवदार सूप घरी तयार करून पिले तर मग मन भरू शकतं. पण एक प्रश्न कायम राहतो हे सूप घरी तयार कसे करायचे? याच प्रश्नाच खास उत्तर देणारी चवदार टोमॅटो सूपाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

सुरूवातीला पाहू या टोमॅटो खाण्याचे फायदे

1) टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. 

2) टोमॅटोमध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. 

3) टोमॅटो मध्ये व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन, ई व्हिटॅमीन आणि व्हिटॅमीन के चा खूप चांगला स्त्रोत असतो. 

व्हिटॅमीन के हा शरिरासाठी फायदेशीर आहे.

4) टोमॅटोमधील रक्त गोठविण्याचं काम हे व्हिटॅमीन के करते. त्यामुळे स्त्रीयांसाठी हे फार उपयोगी आहे.

ही सर्व व्हिटॅमीन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. 

5) व्हिटॅमीन ए ची मात्रा असल्यानं टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये मँगनीज, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक,आर्यन, फॉस्फरस, आणि कॉपर यासारखी खनिजे असते ही खनिजे शरिरासाठी फार उपयोगी असतात. 

6) टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे हदयरोगासारख्या आणि कॅन्सरसारख्या आजरापासून बचाव करण्यासाठी सहायक ठरते.

टोमॅटो सूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

1) टोमॅटो - अर्धा किलो

2) आले लसूण पेस्ट

3) लवंगा - 2 ते 3

4) काळी मिरी -2 ते 3

5) तमालपत्र - 1

6) कांदा - बारीक चिरलेला

7) चवीनुसार मीठ

8) साखर - 1 चमचा

9) बटर - 1 चमचा

10) मलई - गार्निश साठी

कृती:

टोमॅटो, आले, लसूण, तमालपत्र आणि काळी मिरी अर्धा कप पाण्यात कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करून उकळा.

थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या. गाळलेले मिश्रण एका भांड्यात ठेवा आणि गरम करा.

चवीनुसार मीठ आणि एक टीस्पून साखर घालून मिक्स करा. आता त्यात 1 चमचा बटर घाला.

1 ते 2 उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. जर तुम्हाला सूप पातळ वाटत असेल तर 1 चमचा मैद्याचे पीठ 1 चमचे बटरमध्ये तळून घ्या आणि सूपमध्ये मिसळा.

फ्रेश क्रीम आणि ब्रेड क्रॉउटन्सने सजवून मस्त गरमागरम सूपावर ताव मारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT