Yogini Ekadashi 2022 | Upvas Faral sakal
फूड

Yogini Ekadashi 2022: एकादशी स्पेशल करा 'हा' Tasty फराळ, जाणून घ्या रेसिपी

आज आपण एकादशी स्पेशल फराळ रेसिपी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आज ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी योगिनी एकादशी आहे त्यानिमित्ताने आज आपण एकादशी स्पेशल फराळ रेसिपी पाहणार आहोत.

एकादशीला उपवासासाठी भगर हा एक सर्वोत्तम पदार्थ आहे. भगर पचायला हलकी असल्याने उपवासाच्या दिवशी भगर खाणे तब्येतीच्या दृष्टीने चांगले असते. पण भगर आणि आमटी हे दोन्ही पदार्थ करायला खुप वेळ लागतो . त्यामुळे तुम्हाला जर का भगर आणि आमटी असा पदार्थ टाळायचा असेल तर आम्ही तुम्हाला चवदार, खमंग लागणारी भगरीची खिचडी हा पर्यायी पदार्थ सुचवतो.पण आता ही भगरीची खिचडी करायची कशी ? ते सुध्दा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Do you konw the easy and tasty fasting recipe of bhagar check here)

चला तर मग बघू या भगरीच्या खिचडीची रेसिपी..

साहित्य

1) एक मध्यम आकाराची वाटीभर भगर

2) तीन हिरव्या मिरच्या

3) दोन चमचे तूप

4) जिरे

5) शेंगदाण्याचा कुट

6) गरम पाणी

7) दही

8) चवीनुसार मीठ

कृती

  • भगरीची खिचडी करण्यासाठी आधी भगर स्वच्छ पाण्याने धुूवून घ्या आणि तिच्यातील पाणी चांगल निथळून घ्या.

  • नंतर गॅसवर कढई तापवण्यासाठी ठेवुन त्यात तूप घालावे.

  • तूप गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकावेत. जिरे तडतडले की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे टाकावेत.

  • मिरच्या चांगल्या खरपुस परतल्या गेल्या की त्यामध्ये धुतलेली ओलसर भगर टाकावी.दोन ते तीन मिनिटे भगर तुपामध्ये आणि फोडणीमध्ये परतून घ्यावी.

  • भगर परतत असताना ती कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे भगर वारंवार हलवावी.

  • भगर परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकावे. साधारण भगरीच्या वर अर्धे बोट पाणी येईल, अशा पद्धतीने पाण्याचे प्रमाण ठेवावे.

  • पाण्याला उकळी येऊ लागली की त्यामध्ये दोन चमचे दही आणि चार चमचे शेंगदाण्याचा कुट आणि चवीनुसार मीठ टाकावे. सगळे मिश्रण हलवून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.यानंतर भगरीवर झाकण ठेवावे आणि चांगली वाफ येऊ द्यावी

  • दोन मिनिटांनी कढईवरचे झाकण काढून पहावे. भगरीला पाणी कमी पडते आहे, असे लक्षात आले तर पाणी गरम करावे आणि नंतर भगरीमध्ये टाकावे.

  • भगरीला वाफ आली आहे आणि ती शिजली आहे. असे लक्षात येताच गॅस बंद करावा आणि गरमागरम भगर सर्व्ह करावी.

टिप - दही नसल्यास भगरीमध्ये लिंबू पिळले तरी चालते. पण लिंबू किंवा दही यांचा वापर अवश्य करावा. यामुळे भगरीची चव अधिकच रूचकर लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT