Amla Chutney Recipe esakal
फूड

Amla Chutney Recipe : बदलत्या वातावरणात शरीरासाठी आरोग्यदायी ठरेल ही चटपटीत आवळा चटणी

ही चटणी बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल

साक्षी राऊत

Amla Chutney Recipe : आयुर्वेदात आवळ्याचे औषधी गुणधर्म सांगितल्या गेले आहे. याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. म्हणूनच लोक साधारणपणे आवळ्याचे सेवन मुरंब्बा, लोणचे किंवा ज्यूसच्या स्वरूपात करतात. पण तुम्ही आवळा चटणी कधी चाखली आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी आवळा चटणी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही चटणी बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.

आवळा चटणी चवीने आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. याच्या वापराने तुमची दृष्टी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. एवढेच नाही तर आवळा चटणी तुमचे पोट निरोगी ठेवते, चला तर मग जाणून घेऊया आवळा चटणी कशी बनवायची.

आवळा चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • 8-10 आवळे

  • १/२ इंच आल्याचा तुकडा

  • 4 चमचे चिरलेली कोथिंबीर

  • 4-5 पाकळ्या लसूण

  • २-३ हिरव्या मिरच्या

  • 1 टीस्पून मोहरीचे तेल

  • चवीनुसार मीठ

आवळा चटणी कशी बनवायची?

आवळा चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळा नीट धुवून घ्या.

नंतर आवळ्याचे बारीक आणि पातळ तुकडे करा.

यानंतर कोथिंबीर नीट धुवून बारीक चिरून घ्यावी.

नंतर हिरवी मिरचीही धुवून त्याचे बारीक तुकडे करा. (Recipe)

यानंतर या तिन्ही चिरलेल्या गोष्टी मिक्सीमध्ये टाका आणि 1 मिनिट बारीक करा.

नंतर आल्याचे तुकडे, लसणाचे तुकडे, तेल आणि चवीनुसार मीठ मिक्सरमध्ये टाका.

यानंतर, त्यात थोडे पाणी घाला आणि सुमारे 1 ते 2 मिनिटे ग्राइंड करा.

आता तुमची हेल्दी आणि चविष्ट आवळा चटणी तयार आहे. (Food)

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून साधारण आठवडाभर सहज खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT