Delivery partners celebrate as Zomato and Swiggy accept gig workers’ demands, announcing a salary hike after nationwide strike pressure.

 

esakal

फूड

Zomato Swiggy Latest News : ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला

Zomato Swiggy Delivery Partner Strike Latest Update : जाणून घ्या, आताच प्रत्येक फूड ऑर्डरच्या मागे त्यांना किती पैसे मिळणार?

Mayur Ratnaparkhe

Zomato-Swiggy Agree to Gig Workers’ Demands : नववर्षाच्या पूर्वसंध्येस ‘Zomato-Swiggy’ या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनी मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील ‘गिग वर्कर्स’नी ऐन न्यू इयरच्या तोंडावर संप पुकारला होता. त्यामुळे स्विगी अन् झोमॅटोसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. त्यात थर्टीफस्ट नाईट म्हणजे या दोन्ही कंपन्यांसाठी सर्वाधिक कमाई करण्याची मोठी संधी असते, अशावेळी या संपामुळे मोठा फटका बसणार होता. त्यामुळे या दोघांनीही त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या इन्सेंटीव्ह अन् पेमेंटमध्ये वाढ केली आहे. 

खरंतर तेलंगना गिक अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स यूनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ अप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी दावा केला होता की, ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात लाखो गिग वर्कर्स सहभागी होवू शकतात. या संघटनांची मागणी होती की, डिलिव्हरी पार्टनर्सना चांगले वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण आणि सन्माजनक कामाची परिस्थिती मिळावी. या संपाचा परिणाम झोमॅटो आणि स्विगी तसेच ब्लिंकिट, इन्स्टामार्ट आणि झेप्टो सारख्या इन्स्टंट कॉमर्स प्लॅटफॉर्मवर होणार होता. कारण, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला याद्वारे देखील मोठ्याप्रमाणात फूड ऑर्डर दिल्या जातात.

किती पगार वाढवला?-

संपाच्या याच दबावानंतर झोमॅटोने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी आकर्षक ऑफर सादर केली आहे. प्राप्त माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस सायंकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत या पीक अवर्समध्ये एका ऑर्डरवर १२० ते १५० रुपये पर्यंत कमाई होवू शकते. शिवाय, दिवसभर ऑर्डरची संख्या आणि उपलब्धता याआधारे, डिलिव्हरी पार्टनर्स ३ हजारांपर्यंत कमावू शकतात. कंपनीने ऑर्डर रद्द करणे आणि नाकारणे यासाठीचा दंड देखील तात्पुरता माफ केला आहे.

 याचबरोबर स्विगीने वर्षाच्या शेवटच्या दिवसांसाठी वाढीव प्रोत्साहन देखील जाहीर केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विगी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान डिलिव्हरी पार्टनर्सना दहा हजारापर्यंत कमाई करण्याची संधी देत ​​आहे. नवीन वर्षाच्या संध्याकाळी सहा तासांच्या पीक स्लॉटमध्ये दोन हजार पर्यंत कमाईच्यासंधीचा दावा केला जात आहे, जेणेकरून पुरेशा संख्येने रायडर्स उपलब्ध असतील.

तथापि, कंपन्यांचे म्हणणे आहे की हे उपाय दबावाखाली नाहीत, परंतु सण आणि वर्षाच्या अखेरीस स्वीकारल्या जाणाऱ्या मानक कार्यपद्धतीचा भाग आहेत. दुसरीकडे, संघटनांचा आरोप आहे की २५ डिसेंबरच्या संपानंतरही कंपन्यांनी त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, ज्यामुळे ३१ डिसेंबरचा संप अपरिहार्य झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy मध्येही दिसली 'पांड्या पॉवर'; चौकार - षटकारांची बरसात करत झळकावली शतकं, संघाचाही मोठा विजय

Maharashtra Government Decision : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरफाळा, पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलत, नव्याने शासन निर्णय जारी

Nanded News : किनवट येथे विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले; मृत्यूपूर्वी आई-वडिलांविषयी सोशल मीडियावर भावनिक स्टेटस!

Thane Water Supply: नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई झळ, ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन

Ladki Bahin Yojana: पटकन् मोबाईल चेक करा, लाडक्या बहिणींचे पैसे आले; किती हप्ते जमा?

SCROLL FOR NEXT