ganesh article

त्वं ज्ञानमयः विज्ञानमयः

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. आर्या जोशी

पाशांकुशवरद हस्त। एके करी मोदक शोभत।

मूषकावरि अति प्रीत। सर्वांगी सिंदूर चर्चिला।।

असे गणपतीचे मोहक रूप.

गणपतीचा मोठा आकार पाहता तो एका चिमुकल्या उंदरावर स्वार होतो ही कल्पना आश्चर्यकारक वाटते. परंतु तरीही बालगोपाळांना गणपतीसह असलेल्या या उंदीरमामाचे विशेष आकर्षण असते.

गणेश पुराणात एक आख्यायिका आहे. एक गंधर्व होता. त्याचं नाव क्रौंच. इंद्रदेवाच्या सभेत एकदा तो फिरत असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. वामदेव लगेच रागावून त्याला म्हणाले की ‘‘तू उंदीर होशील.’’ उंदीर झालेला तो गंधर्व पराशर ऋषींच्या आश्रमात आला आणि तिथले सगळे पदार्थ खायला सुरूवात केली. हे पाहून पराशर ऋषी गोंधळले.

या संकटातून सोडविण्यासाठी पराशरांनी गणेशाची प्रार्थना केली. गणेश प्रकटला आणि त्याने उंदराला वर मागण्यास सांगितले. परंतु उन्मत्त उंदराने गणपतीलाच सांगितलं की ‘‘तूच मला वर माग.’’ हे ऐकून गणपती रागावला आणि आजपासून तू माझे वाहन हो असा आदेश त्याने उंदराला दिला.

उंदीर हा गणपतीचे वाहन कसे बनला असावा याची या प्रातिनिधीक आख्यायिकेच्या आधारे कल्पना येते.गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उंदीरमामाला खिरीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धतीही लोकसंस्कृतीत रूढ असलेली दिसून येते.

चंचल, सतत इकडून तिकडे धावणारा असा हा मूषक अज्ञानाचे प्रतीक. ज्ञानाची, विद्येची देवता असलेला गणपती त्यावर आरूढ होतो. ज्ञानाने अज्ञानावर मिळविलेला विजय हे गणपतीचे गुणवैशिष्ट्य या रूपकातून दिसून येईल. ज्ञानाची उपासना करायची असेल तर भौतिक वस्तूंचा मोह टाळत, एकाग्र चित्ताने, स्वस्थपणाने, एका जागी बसून अभ्यास करणे, मनाची धावपळ कमी करणे, चिंतन करणे महत्त्वाचे आहे हे या रूपकातून शिकण्यासारखे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

Godavari Mystery: गोदावरीच्या पुराच्या पाण्यात अनोळखी युवकाचा मृतदेह; कायगाव परिसरात खळबळ, ओळख अद्याप गूढ

Kalyan News: रुग्णाच्या फॅक्चर पायाला प्लास्टरऐवजी लावला पुठ्ठा, कल्याणमध्ये पालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

Mangalwedha Farmers: मंगळवेढ्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! शिरनांदगी तलाव आटला, ११ ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT