हिंगोली : शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने सहा ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असुन रविवारी ता. १९ येथे घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्ती चे विसर्जन केले जात आहे.
हिंगोली : शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने सहा ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असुन रविवारी ता. १९ येथे घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्ती चे विसर्जन केले जात आहे. 
ganesh article

Ganesh Visarjan : हिंगोलीत गणपती विसर्जनास सुरूवात

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली (Hingoli) शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) पालिका प्रशासनाने सहा ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असुन रविवारी (ता.१९) येथे घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. ना बँड, ना ताशा, ना मिरवणूक, ना जयघोष शांतपणे केले जातेय गणपती विसर्जन. हिंगोली नगरपालिकेने (Hingoli Municipal Council) बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरात सहा ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे. त्यामध्ये एनटीसीमध्ये महेश उद्यानात, गांधी चौक, नवीन नगर परिषद इमारत जवळ, अग्निशमन केंद्राजवळ, दत्त मंदिर परिसरात शिवाजीनगर, आदर्श कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ तलाव निर्मिती करण्यात आली आहे.

यासह दोन फिरते विसर्जन कुंड गल्लोगल्ली जाऊन सुध्दा बाप्पाचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. पालिका प्रशासनाने हिंगोलीकर भाविकांना विनंती केली आहे की, निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांत विसर्जन करून पर्यावरणपूरक विसर्जन करून सहकार्य करावे असे आवाहन केले होते. त्याला हिंगोलीकर प्रतिसाद देत आहेत. यासह कयाधू नदी पात्र येथे तसेच जलेश्वर व सिरेहशहा बाबा तलाव या ठिकाणी देखील गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT