Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021 esakal
ganesh article

साताऱ्यातील पाच मानाच्या गणपतींचं महत्त्व आजही कायम!

Balkrishna Madhale, नरेंद्र जाधव

सातारा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2021) सुरूवात केली होती. यामुळे राजधानी साताऱ्यात गणेश उत्सवाला (Satara Ganpati Festival) विशेष महत्त्व आहे. साताऱ्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा सलग दुसऱ्या दिवशी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर विरजन पडलंय. काळानुसार साताऱ्यात गणेशोत्सवाचं स्वरुप बदललं असलं, तरीही साताऱ्यातील मानाच्या पाच गणपतीचं महत्त्व आजही कायम आहे. जाणून घेऊया कोणते आहेत मानाचे पाच गणपती…

काळानुसार साताऱ्यात गणेशोत्सवाचं स्वरुप बदललं असलं, तरीही साताऱ्यातील मानाच्या पाच गणपतीचं महत्त्व आजही कायम आहे.

शंकर-पार्वती गणपती, शनिवार पेठ

शंकर-पार्वती गणपती, शनिवार पेठ : सातारा शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला श्री शंकर-पार्वती गणपती नवसाला पावणारा महादेव म्हणून देखील ओळखला जातो. याचे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे, या गणपतीचे कोणतेही मंडळ, देवस्थान किंवा ट्रस्ट नाहीये, यासाठी कोणतीही वर्गणी गोळा केली जात नाही. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या वस्तू व पैशातूनच उत्सवाचा खर्च भागविला जातो. शनिवार पेठेतील परदेशी कुटुंबीय यांच्या कडून या मूर्तीची गणपतीच्या उत्सवकाळात 10 दिवस प्रतिष्ठापणा त्यांच्याच खासगी जागेत केली जाते. ही परंपरा गेल्या तीन पिढ्यांपासून अखंडित सुरु आहे. आताच्या चौथ्या पिढीत ही मूर्ती राहुल परदेशी बनवितात. शंकर त्याच्या उजव्या बाजूला गणपती, तर डाव्या बाजूला पार्वती असणारी ही मूर्ती पूर्णपणे शाडूची बनवलेली असते, ती प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीने विसर्जित केली जाते.

जयहिंद गणेशोत्सव मंडळ

जयहिंद गणेशोत्सव मंडळ : या मंडळाची स्थापना सन 1922 मध्ये झाली असून यंदाचे 2021-22 हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. या मंडळाने आत्तापर्यंत विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच आजतागायत प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील राबविले आहेत. साताऱ्यात सर्वप्रथम रनिंग लाइट आणण्याचा मान देखील याच मंडळाला जातो. या गणेश मूर्तीचे विसर्जन दरवर्षी मर्दानी खेळाव्दारे होत असते. या मंडळाला सुंदर मूर्ती, सुंदर सजावट, मर्दानी खेळ, शांतता मिरवणूक यासाठी अनेक पारितोषिकं मिळाली आहेत.

आझाद हिंद मंडळ, सोमवार पेठ

आझाद हिंद मंडळ, सोमवार पेठ : लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात करण्याआधीपासूनच साताऱ्यातील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला होता. 1907 साली या मंडळाची स्थापना झाली असून साताऱ्यातील हे पहिले गणेश मंडळ आहे. सोमवार पेठेतील आझाद हिंद गणेश मंडळाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रेरणा घेवून गणेश मंडळाचे नाव आझाद हिंद ठेवले आहे. आपल्या नावाप्रमाणे सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना या मंडळात मुक्त प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे, हिंदूंच्या या उत्सवात या मंडळाने आपल्या पेठेतील मुस्लिम समाजालाही एकत्र घेतले आहे. तसेच या मंडळाचे अध्यक्ष पदही एका मुस्लीम समाजाच्या व्यक्तीने तब्बल 10 वर्षे भूषविले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवणाऱ्या या मंडळाने दांडपट्टा, ढोल वाद्यातही चांगले प्राविण्य मिळवले होते. या मंडळाचे कै. रामभाऊ गवळी, धोंडिबा शिंदे, सिकंदर बागवान, चंद्रकांत खर्शीकर, प्रल्हाद निगडकर, हकीम मास्टर, सूरज मुल्ला, प्रल्हाद वाघोलीकर, असे अनेक वस्ताद शहराला दिले आहेत. प्रत्येक वर्षी उत्सव काळातील शेवटचे पाच दिवस महाप्रसादाचे वाटप मंडळाच्यावतीने करण्यात येते.

गुरुवार तालीम सार्वजिक गणेशोत्सव मंडळ

गुरुवार तालीम सार्वजिक गणेशोत्सव मंडळ, गुरुवार पेठ : या मंडळात सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना मुक्त प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे, हिंदूंच्या या उत्सवात मुस्लिम बांधवांना देखील सहभागी करुन घेतलं जातं. मुस्लीम धर्मियांचा ताबुत उत्सव व हिंदु बांधवांचा गणेशोत्सव या काळात एकत्ररित्या साजरे करतात, त्यामुळे शहरात सामाजिक बांधिलकीचे ऐक्य पहायला मिळते. या मंडळाने आजवर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. शिवाय, मंडळाकडून गरजूंना देखील मदत केली जात आहे. कोविड काळात या मंडळाने विशेष पुढाकार घेऊन अनेक नागरिकांचा जीव वाचवला आहे.

अंजिक्य गणेशोत्सव मंडळ, राजवाडा

अंजिक्य गणेशोत्सव मंडळ, बुधवार पेठ : या मंडळाची स्थापना 1932 साली झाली असून हे मंडळ आता 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या शिवाय, दर महिन्यात संकष्टी चतुर्थी दिवशी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पहायला मिळते. या मंडळाने सामाजिक भान जपत अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT