Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022 
ganesh article

Ganeshotsav 2022 : घरगुती गणेशाच्या सजावटीसाठी काही खास आयडिया

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गणेशाच्या आगमनानंतर वातावरण प्रसन्न होते आणि भक्तगण श्री गणेशाच्या भक्तीत तल्लीन होतात. दरम्यान, काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून लोक घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी करताना दिसत आहेत. नागरिकांनी घरांना स्वच्छ करण्यास आणि सजवून रंगरंगोटी करण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण गणेशाच्या आरस करण्यासाठी काही नवीन थीम शोधत असतात. नवीन डेकोरेशन करत घरी आलेल्या बाप्पा सुंदर दिसावा यासाठी प्रयत्नात असतात. तुम्हालाही यंदाच्या गणेशोत्सवासाठी घर सजवायचे असल्यास काही कल्पना तुम्हाला सांगत आहोत..

मंडप आणि पूजेचा कक्ष वनस्पतींनी सजवा

तुम्हाला गणेशोत्सवाच्या सजावटीला नैसर्गिक स्वरूप द्यायचे असल्यास तुम्ही यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करु शकता. गणेशाचा मंडप आणि पूजेचा कक्ष वनस्पतींनी सजवू शकता. यामुळे गणेशोत्सवाच्या सजावटीला नैसर्गिक रूप मिळेल. यामुळे घरातील वातावरणही ताजेतवाने आणि फ्रेश राहील.

भिंती सजवा

गणेशोत्सवात अनेकदा लोक फुलं, फुग्यांनी घर आणि घराच्या भिंती सजवतात. यावेळी तुम्ही बदल म्हणून पारंपारिक पद्धतीने घर सजवून काही नवीन ट्राय करु शकता. या गणेशोत्सवात तुमच्या घराच्या भिंतींना नवा लुक द्या, जेणेकरून त्या खुलून दिसतील. गणेशोत्सवासाठी तुम्ही तुमच्या भिंतींना अध्यात्माशी संबंधित क्रिएटिव्हिटीने सजवू शकता. किंवा वारली पेंटिंग्जनेही सजवू शकतात.

घरच्या घरी गणेशाची मूर्ती बनवा

जर तुम्ही दरवर्षी बाजारातून गणेशमूर्ती आणत असाल तर यावर्षी काहीतरी नवीन करू शकता. बाजारातून मूर्ती आणण्यापेक्षा घरीच गणेशाची मूर्ती तयार करु शकता. तुम्ही स्वतः घरी यासाठी गणेशमूर्ती बनवू शकता. तो इकोफ्रेंडली पद्धतीनेही तयार करु शकता. यासाठी कागदाचा वापरही करु शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही माती किंवा चॉकलेटपासून गणेशाची मूर्ती बनवू शकता.

फुले, मेणबत्त्या, दिवे आणि स्ट्रिंग लाइट्सने सजवा

कोणताही धार्मिक सण फुले आणि रोषणाईशिवाय अपूर्ण असतो. या गणेशोत्सवात तुम्ही पूजेची खोली आणि मंडपासाठी काही नवीन आयडिया क्रिएट करु शकता. गणेशासाठी हे मंडप सुंदर फुलांनी किंवा लाईट्सनी सजवू शकता. यासह, मेणबत्त्या, दिवे आणि स्ट्रिंग लाइट्सने घराला एक अतिशय आकर्षक रूप देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT