Shree Ganesha sakal media
ganesh article

पर्यावरणस्नेही शाडूच्या गणेश मूर्तींकडे भक्तांचा कल

सुनिता महामुनकर

मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण (environment protection) लक्षात ठेऊन दरवर्षी गणेश उत्सवामध्ये (Ganpati festival) अधिकाधिक कल्पकता निर्माण होत आहे. पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती (Ecofriendly Ganesh Idols) तयार करणे हा याचाच एक उत्तम पर्याय आहे. पीओपी मूर्तींवर (POP Idols restrictions) बंधने आल्यानंतर बाप्पाच्या मूर्तींच्या अशा पर्यायांकडे भाविकांची ओढ अधिकाधिक निर्माण होत आहे.

शाडूच्या मातीच्या मूर्त्या या पारंपरिक मूर्त्या म्हणून गणेश भक्तांची नेहमीच पसंती ठरली आहे. पण त्याचबरोबर कागदापासून, लाल मातीपासून आणि शेणापासून तयार झालेल्या शंभर टक्के पर्यावरण सुरक्षित मूर्त्यांना आता मागणी मिळत आहे. मागील दोन वर्षात प्रदूषणामुळे झालेल्या परिणामांचा विचार करता पर्यावरण संवर्धनासाठी उचललेले हे एक आशादायी पाऊल आहे.

पेपर गणपती

इको फ्रेंडली गणेश मूर्तीमध्ये कागदापासून बनविलेल्या गणेश मूर्ती ही अत्यंत लोकप्रिय आहेत. वर्तमानपत्रांची रद्दी, व्हाईटिंग, खाण्याचा डिंक आणि तांदळाची पेस्ट असे सर्व घरगुती साहित्य घेऊन तयार केली जाणार्या या पेपर गणेश मूर्ती लोभस आणि संपूर्णपणे पर्यावरण पूरक असतात. कुर्ला येथील शेल कौलनीमध्ये मूर्तीकार संदीप गजकोश प्रथमेश कार्यशाळेत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा आपला छंद जोपासतात. ते मुंबई महापालिकेमध्ये काम करतात पण गणेश मूर्ती बनविण्याची त्यांना आवड आहे.

पेपर गणपती

"पर्यावरणच्या द्रुष्टीने पूरक ठरतील अशा पेपर गणेश मूर्ती तयार करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करतो. शाडूच्या मूर्ती या जड असतात आणि त्याला कधीकधी तडा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सुबक आणि वजनाने हलकी अशी गणेश मूर्ती पेपरपासून तयार होऊ शकते", असे गजकोश यांनी सांगितले. साधारणपणे सहा इंचापासून पंधरा फूट पर्यंत या मूर्ती आम्ही तयार करतो. सध्या कोविड 19 मुळे निर्बंध आहेत. त्यामुळे सगळ्यावरच आर्थिकदृष्ट्या परिणाम झाला आहे. पण लोकांमध्ये पर्यावरण विषयक जाग्रुती होत अआहे, असे ही ते म्हणाले. बौलीवूड कलाकारांपासून परदेशात देखील त्यांच्या मूर्तींना मागणी असते. कुटुंबाबरोबरच महिला बचत गटामार्फतही मूर्ती काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लाल मातीचा बीज गणेशा

ग्रीन प्रैक्टिसेस या पर्यावरण प्रेमी संस्थेमध्ये पारंपरिक मूर्तीबरोबर लाल मातीपासून बनविलेल्या मूर्त्या तयार केले जातात. मूर्ती तयार करताना त्यामध्ये आपल्याला हव्या त्या रोपांच्या बिया टाकूनही मूर्ती बनविली जाते. यामध्ये वापरली जाणारी माती नेहमीची माती नसून अधिक शुद्ध आणि मूर्तीकामासाठी पोषक असते. यामध्ये सूर्यफूल, कोथिंबीर आणि तुळशीच्या बियांसह असलेल्या मूर्त्यांना अधिक मागणी असते, असे माना शहा यांनी सांगितले. मागील काही वर्षात पर्यावरण पूरक मूर्ती घेण्याचा कल वाढला आहे. पण कोरोनामुळे यावर परिणाम झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. भाविकांना या मातीचा वापर विसर्जनानंतर घरामध्ये रोप लावण्यासाठी होत असतो, त्यामुळे त्याचे वेगळे आकर्षण असते, असे शहा म्हणाल्या.

मातीचा गणपती

गोमय गणेश बाप्पा

शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गोमय गणेश मूर्ती ही अभिनव संकल्पना पालघरमध्ये मुरबाड भागांत राबविली जात आहे. तेथील आदिवासी महिला एटी कंपनीच्या माध्यमातून या पूर्णपणे पर्यावरण स्नेही मूर्ती साकारतात. या मूर्तीचे रंगकाम आणि विक्री लक्ष्य आर्ट फाऊंडेशनचे वतीने केले जाते. दिव्यांग मुलांच्या मदतीने या मूर्तीचे रंगकाम करण्यात येते आणि ग्राहकांकडून याला छान प्रतिसाद आहे असे लक्ष्य आर्टच्या सोनाली घाटे-बाणे यांनी सांगितले. शेणाला पारंपरिक महत्त्व आहे आणि त्यापासून या गोमय मूर्त्या साकारल्या आहेत.

गोमेय गणपती

यामुळे विसर्जनानंतर याचा वापर बागेत खत म्हणून होऊ शकतो किंवा प्रो-बैक्टेरियल या शेणाच्या गुणधर्मामुळे पाणी शुध्दीकरणामध्येही याचा उपयोग होतो, असे पर्यावरण महत्त्व त्यांनी सांगितले. शेणाच्या मूर्ती तयार करण्याचे आमचे हे पहिलेच वर्ष आहे. पण तरीही मुंबई आणि मुंबई बाहेरून हैदराबाद, पुणे अशा ठिकाणाहून याबाबत विचारणा होत आहे, परळमध्ये या मूर्त्या उपलब्ध असून पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत, असे त्या म्हणाल्या. दिव्यांग मुलांसाठी लक्ष्य आर्ट विविध उपक्रम राबवित असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT