Sangitsakshi Ganesh
Sangitsakshi Ganesh esakal
ganesh article

कलांचा अधिपती नाशिकचा संगीतसाक्षी गणेश!

सकाळ डिजिटल टीम

लेखक - सुनील शिरवाडकर

नाशिक : गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आपण जाणून घेतोय नाशिक मधील गणपती मंदिरांचे विशेष महत्त्व आणि त्याला असलेला इतिहास.

आज आपण जाणुन घेतोय ज्या गणेशाच्या साक्षीने अनेक कलाकारांच्या सांगितिक वाटचालीस सुरुवात झाली असा कलांचा अधिपती 'संगीतसाक्षी गणेशाची' कहाणी.

साडेआठचा भोंगा झाला. मेनरोड हळुहळु शांत झाला. साडेनऊच्या सुमारास तर रस्त्यावर पुर्ण सामसुम झाली. आणि रसिकांचे पाय गणपती मंदिराकडे वळु लागले. गुरुवारची रात्र म्हणजे संगीताची मेजवानी. रात्रीचे जेवण झाले की रसिक श्रोत्यांनी डोंगरेंच्या गणपती मंदिरात जमायचं हा शिरस्ता.

रघुनाथराव डोंगरेंना संगीताची, गायनाची आवड. संध्याकाळीच त्यांनी बैठकीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. पांढऱ्या शुभ्र चादरींनी गाद्या आच्छादीत केल्या होत्या. त्यावर तक्के, लोड, अंतरा अंतरावर पानाची तबके, छताला टांगलेल्या हंड्यांमधुन सोनेरी पिवळा प्रकाश पाझरत होता. दुतर्फा असलेले सागवानी खांब नुकतेच तेलपाणी केल्याने चमकत होते.

गाभाऱ्यात असलेल्या सुबक, लाकडी देवाऱ्ह्यात असलेली गणेश मूर्ती आज अधिकच तेजस्वी भासत होती. सुपासारखे पण नाजुक कान आज आतुर झाले होते.

कारण आज विनायकबुवा परांजपे मैफल सजवणार होते. ठिक दहा वाजता विनायकबुवांनी बैठकीचा ताबा घेतला. हळुहळु मैफल रंगत गेली. वेळेचे भानही कोणाला नव्हते. पहाटेचा चहा समोर आला आणि बैठकीची सांगता झाली.

१८९१ साली या गणेश मंदिराची स्थापना झाली. दामोदरपंत डोंगरे हे याचे संस्थापक. तसं हे खाजगी देवस्थान. पण खरंतर रघुनाथराव डोंगरे यांच्यामुळे ते अवघ्या नाशिककरांचे झाले. रघुनाथरावांना गायनाची आवड. रात्रीचे जेवण झाल्यावर ते येथे येऊन रियाज करीत. तेथे काही संगीतप्रेमी त्यांच्यासोबत जमु लागले. गाऊ लागले. मग त्यांनी ठरवलं. दर गुरुवारी एका गायनाची नाही तर वादनाची बैठक ठेवायचीच.

नाशिकमधील जवळपास प्रत्येक गायकाने आणि वादकाने आपली सेवा या गणेशासमोर रुजु केली आहे. सात वर्षापासून माघी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. त्या उत्सवात अनेक नामवंत कलाकार येथे येण्यासाठी उत्सुक असतात. मग कधी आरती अंकलीकर येतात.. कधी अजित कडकडे..तर कधी संजीव अभ्यंकर येतात.

'गणेश भक्त मंडळी' चा..अर्थात डोंगरे यांचा हा गणपती... कलांचा अधिपती... त्याच्या साक्षीने किती तरी कलाकारांच्या सांगितिक वाटचालीस सुरुवात झाली आहे. म्हणुनच एका अर्थाने हा नाशिकचा 'संगीतसाक्षी गणेश' आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT