ganesh  esakal
ganesh article

गणेशोत्सव विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

310 पोलिस कर्मचारी, 700 महापालिका कर्मचारी, 72 गाड्या

सकाऴ वृत्तसेवा

महापालिका व पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

सोलापूर: कोरोनाच्या सावटाखाली रविवारी (ता.19) श्री गणरायाचा विसर्जन सोहळा भक्‍तीमय वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी 100 संकलन केंद्रे, 11 विसर्जन केंद्रे आदी ठिकाणी 310 पोलिस कर्मचारी, 700 महापालिका कर्मचारी व 72 गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मूर्ती संकलनासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंतची वेळ असून नागरिकांनी संकलन केंद्रावर वेळेत मूर्ती आणून द्याव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

सोलापूर शहर व परिसरातील महापालिकेच्या विभागीय कार्यालय परिसरात शासकीय सभागृह, शाळा, उद्याने, समाजमंदिर व मंगलकार्यालय आदी 100 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्राची उभारणी केली आहे. नागरिकांनी घरातच विधीवत पूजा करून मूर्ती संकलन केंद्रावर वेळेत आणून द्यावे. प्रत्येक केंद्रावर विभागीय कार्यालयामार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. प्रतिकेंद्रावर दोन महापालिका कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्‍त शहरात 11 विसर्जन केंद्र असून या ठिकाणी महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत "श्रीं'चे विसर्जन होणार आहे. नागरिकांना येण्यास सक्‍त मनाई आहे.

मूर्ती संकलनासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत वेळ असणार आहे. महापालिकेकडून वेळेवर विसर्जन होण्याकरिता नागरिकांनी नियोजित वेळेतच मूर्ती संकलन करावे, असेही आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरातील संकलन केंद्रावर व विसर्जन केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. शांततेच उत्सव पार पाडण्यासाठी प्रत्येक संकलन केंद्रावर दोन पोलिस आणि प्रत्येक विसर्जन केंद्रावर 10 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.

विसर्जन कुंडांमध्ये वाढ

गतवर्षीप्रमाणे यंदाही विभागीय कार्यालय परिसरातील आठ विहिरी गणपती विसर्जनासाठी निश्‍चित करण्यात आल्या होत्या. परंतु वेळेत विसर्जन प्रक्रिया पूर्ण व्हावे, यासाठी महापालिकेने सिध्देश्‍वर तलाव गणपती घाट, पोलिस मुख्यालय, कोयना नगर हे तीन विसर्जन कुंड वाढविले आहेत. जुनी मिल कंपाउंड येथील विसर्जन रद्द करण्यात आले. त्याला पर्याय म्हणून गणपती घाटावर विसर्जन होणार आहे.

बातमीदार - प्रमिला चोरगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT