ganesh esakal
ganesh article

गणेशमुर्ती विसर्जनाची 'या' ठिकाणी सोय! गर्दी नकोच, हालचालींवर पोलिसांचा वॉच

तात्या लांडगे

नागरिकांनी संकलन केंद्रांवर मूर्ती आणून द्याव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

सोलापूर: कोरोनाच्या सावटाखाली रविवारी (ता.19) श्री गणरायाचा विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी 100 संकलन केंद्रे तर 11 विसर्जन केंद्रे आहेत. त्याठिकाणी 310 पोलिस व 700 महापालिका कर्मचारी आणि 72 गाड्या असतील. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मूर्ती संकलन केले जाणार आहे. नागरिकांनी संकलन केंद्रांवर मूर्ती आणून द्याव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

शहर व परिसरातील महापालिकेच्या विभागीय कार्यालय परिसरातील शासकीय सभागृह, शाळा, उद्याने, समाजमंदिर व मंगल कार्यालयासह 100 ठिकाणी मूर्ती संकलन केले जात आहे. नागरिकांनी घरात विधीवत पूजा करून मूर्ती त्याठिकाणी आणून द्यावी. प्रत्येक केंद्रावर विभागीय कार्यालयाचा वॉच असणार आहे. प्रत्येक केंद्रावर महापालिकेचे दोन कर्मचारी असतील. या व्यतिरिक्‍त शहरात 11 विसर्जन केंद्र असून तिथे नागरिकांना येण्यास सक्‍त मनाई आहे. मूर्ती संकलनासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत वेळ आहे. शहरातील संकलन केंद्रावर व विसर्जन केंद्रावर पोलिसांचाही बंदोबस्त असणार आहे.

विसर्जन कुंडांमध्ये वाढ

गतवर्षीप्रमाणे यंदाही विभागीय कार्यालय परिसरातील आठ विहिरी गणपती विसर्जनासाठी निश्‍चित करण्यात आल्या होत्या. परंतु, वेळेत विसर्जन प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी महापालिकेने सिध्देश्‍वर तलाव गणपती घाट, पोलिस मुख्यालय, कोयना नगर येथील विसर्जन कुंडातही विसर्जनाची सोय केली आहे. जुनी मिल कंपाउंड येथील विसर्जन रद्द करण्यात आले. त्याला पर्याय म्हणून गणपती घाटावर विसर्जन होणार आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सोलापूर: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचाही गणेशोत्सव साध्या पध्दतीनेच साजरा करण्यात आला. आज (रविवारी) गणेश विसर्जन असून त्यानिमित्ताने गर्दी होऊ नये म्हणून विविध ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरातील जुळे सोलापूर, जुना विडी घरकूल, रुपाभवानी मंदिर, शेळगी, नवीन विडी घरकूल अशा विविध ठिकाणांसह शहराअंतर्गत पोलिसांचा बंदोबस्त लावला जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे गर्दी होऊ नये, गर्दीतून कोरोनाला आमंत्रण मिळणार नाही, याची खबरदारी पोलिस प्रशासन घेणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी पोलिस अधिकारी व अंमलदारांची नियुक्‍ती केली आहे. त्यामध्ये तीन पोलिस उपायुक्‍त, पाच सहायक पोलिस आयुक्‍त, 23 पोलिस निरीक्षक, 46 सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, 978 पोलिस अंमलदार आणि 376 होमगार्ड असा बंदोबस्त असेल, असेही आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करून गर्दी केल्यास त्यांच्या कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिस आयुक्‍तालयाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT