Ganesh Chaturthi special wishes in marathi esakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023 : प्रियजनांना द्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा खास, हे घ्या नवेकोरे संदेश अन् फोटो

कोणते मेसेज पाठवाल, याची लिस्टच इथे आहे

Pooja Karande-Kadam

 Ganesh Chaturthi 2023 : मराठी वर्षांतील श्रावण महिना म्हणजे वेगवेगळ्या सणांची सुरूवातच होय. आता 18 सप्टेंबरपासून सुरू होणारी गणेश चतुर्थी 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सण म्हणजे एकमेकांना भेटण्याचा, नटण्याचा आणि मिरवण्याचा दिवस होय. आता गणपतीबाप्पांच्या आगमणाला त्यानंतर येणाऱ्या गौरींना घरातल्या गौरीही सजतात.

शहरात राहणाऱ्या लोकांसाठी प्रत्येकाकडे गणपती येतात अस नाही. त्यामुळं एकमेकांकडं आरतीला जाणं होतं. पण, प्रत्येकवेळी घरातले सण सोडून इतरांना भेटणं शक्य होत नाही.

अशावेळी संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी कोणते मेसेज पाठवाल, याची लिस्टच इथे आहे. तुम्ही ते इथून कॉपी करून सहजरित्या पाठवू इतरांना फॉरवर्ड करू शकता.

जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ.

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फ़ुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

गणपती बाप्पा मोरया

मंगल मूर्ती मोरया

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

कोणतीही येऊदे समस्या

तो नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या गणरायाला नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ.

Ganesh Chaturthi special wishes in marathi

गणराया तुझ्या येण्याने

सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,

सर्व संकटाचे निवारण झाले

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,

असाच आशीर्वाद राहू दे…

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!

श्रींच्या चरणी कर माझे जुळले,

तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,

तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,

सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले,

अशीच कृपा सतत राहू दे…

सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!! (Ganesh Chaturthi 2023)

Ganesh Chaturthi special wishes in marathi

देवबाप्पा तू सोबत असतो

म्हणून

संकटाना समोर जाण्याची

ताकद दुप्पट होते.

|| गणपती बाप्पा मोरया ||

आम्ही आमच्या वाढदिवसाची पण जेवढी वाट पाहत नाही

तेवढी तुझ्या आगमनाची पाहतोय देवा

तुम्ही आलात आणि आमच्या आनंदाला पारावर उरला नाही

सुखालाही वाटतोय आता आमचा हेवा

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi special wishes in marathi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT