Mukhshuddhi Modak Recipe  Sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023 Special Recipe : मुखशुद्धी मोदक रेसिपी VIDEO

Mukhshuddhi Modak Recipe विड्याच्या पानांच्या मोदकाची रेसिपी जाणून घेऊया

Harshada Shirsekar

Mukhshuddhi Modak Recipe : आपण आजवर ड्राय फ्रुट्स मोदक, पेढ्याचे मोदक, चॉकलेट मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा आस्वाद घेतला असेल. पण आपण कधी मुखशुद्धीचे मोदक खाल्ले आहेत का? नाही म्हणता. 

चला तर या मोदकांची रेसिपी जाणून घेऊया. या मोदकाच्या सारणामध्ये विड्याची पाने, गुलकंदाचा समावेश असल्याने हे मोदक आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतात. 

साहित्य : किसलेले ओले खोबरे - एक वाटी, गूळ - पाव वाटी, विड्याची पाने - तीन ते चार, बडीशेप - एक चमचा, खसखस - एक चमचा, टूटी-फ्रुटी - एक चमचा, गुलकंद - दोन चमचे, मिल्क पावडर - एक चमचा, वेलची पूड

उकडीचे साहित्य -

  • तांदळाचे पीठ - एक वाटी

  • दूध - दोन चमचे

  • तूप - एक चमचा

  • पाणी - एक वाटी

  • चिमूटभर मीठ

मोदकाचे सारण कसे तयार करावे?

कृती - 

  • सर्वप्रथम एका कढईत खोबरे आणि गूळ परतून घ्या.

  • गूळ विरघळल्यावर त्यात मिल्क पावडर मिक्स करावी. 

  • खसखस, बडीशेप मिक्स मिश्रण चांगले एकजीव करावे.

  • गॅस बंद करा आणि मिश्रणात गुलकंद, टूटी-फ्रुटी, वेलची पूड, आणि कापलेली विड्याची पानेही मिक्स करावीत.

उकड कशी तयार करावी? 

  • एका भांड्यामध्ये पाणी, दूध, तूप, मीठ उकळत ठेवा.

  • उकळी येताच त्यात तांदळाचे पीठ मिक्स करावे.

  • सर्व मिश्रण ढवळून एकजीव करा.

  • गॅस बंद करून मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवा.

असे तयार करा मोदक

  • तांदळाची उकड नीट मळून घेऊन त्याचे लहान गोळे करा.

  • गोळे लाटून घेऊन त्यात सारण भरा.

  • पारीला कळ्या पाडून मोदकाचा आकार द्यावा.

  • मोदक १० मिनिटे पाण्यावर वाफवून घ्यावेत.

  • तयार झालेल्या मोदकांवर तूप घालून सर्व्ह करा.

विड्याच्या पानांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण खूप असते, जे आरोग्यासाठी लाभदायक असते. 

तर मग यंदा घरी नक्की करून पाहा मुखशुद्धी मोदक

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT