Ganesh Chaturthi 2023 esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2023: गल्लीत तुमचंच डेकोरेशन गाजणार; बाप्पासाठी करा एका तासात तयार होणारं डेकोरेशन!

तुम्ही केलेली प्रत्येक सजावट बाप्पाला आवडतेच

Pooja Karande-Kadam

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश महोत्सव 10 दिवस चालतो आणि लोक त्यांच्या सोयीनुसार 3 दिवस किंवा 10 दिवस गणपती आणतात. आणि विधीपूर्वक त्याची पूजा करतात. यंदाही गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र लोक सज्ज झाले आहेत.

गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी अनेक दिवसांपासून सुरू असते. लोक रात्रभर जागून गणपतीसाठीचे डेकोरेशन करतात. पण खरे डेकोरेशन तर गणपती बाप्पाच्या आगमणाच्या आधल्या रात्रीच पूर्ण होतं.

काही लोक ऑफिस सांभाळून मिळेल त्या वेळात डेकोरेशन करतात. तर, काही लोक पूर्ण नियोजनबद्ध वेळ काढून सजावट करतात. काही लोक सजावट विकतच आणतात तर काही लोक कलाकुसर करून घरात आहे त्या वस्तूंमध्ये डेकोरेशन करतात.

शेवटी सगळ्यांचा भक्तीभाव महत्त्वाचा. त्यामुळे तुम्ही केलेली प्रत्येक सजावट बाप्पाला आवडतेच. मग ती खऱ्या फुलांची असो वा खोट्या. बाप्पा सगळंच गोड मानून घेतो.  

आता गणपती अक्षरश: तोडांवर आले आहेत. तुम्ही आजूनही काही सजावट फायनल केली नसेल तर काळजी करू नका. आम्ही आहोत ना. गणपती बाप्पांसाठी चांगले आणि कमी वेळात पूर्ण होणारे डेकोरेशन कसे करायचे याच्या काही भन्नाट आयडीया पाहुयात.

पडदा आणि काठ्यांची थीम

गणपती बाप्पा जिथे बसवणार आहात त्याच्या मागे असलेली भिंत रिकामीच ठेऊ नका. त्यावर कोणत्याही गडद रंगाचा पडदा लावा. त्यावर चार ते पाच मोठ्या काठ्या एकमेकांना बांधून चौकोन आकार बनवा. आता त्या प्रत्येक चौकोनात तुम्ही फुलांची माळ, किंवा मोठे आकर्षक लटकन लावू शकता.

पडदा आणि काठ्यांची थीम

पानांची सजावट

तुम्हाला पाना फुलांच्या मखरात बसलेला गणपती बाप्पा हवा असेल. तर, कोणाच्याही दारात सहज मिळणारी ही शोभेच्या झाडांची पाने वापरू शकता. त्यासाठी नारळाच्या पानांसारखी दिसणारी छोटी दोन-तीन घेऊन ती अशा पद्धतीने सजवू शकता.

प्लास्टिक कप

चहा, ज्यूससाठी वापरत असलेले प्लास्टिकचे कप वापरूनही तुम्ही डेकोरेशन करू शकता. त्यासाठी एका आकाराचे कप स्टॅपलरच्या सहाय्याने एकमेकांना चिटकवा आणि त्या कपच्यामध्ये होल पाडून लाईटचे छोटे बल्ब लावू शकता.  

पुठ्ठ्याची कमान

एका पुठ्ठ्यावर कमानीचा आकार काढून तो कापून घ्या. त्याला हवा तो रंग देऊन मोती आणि रंगानी सजवा. त्यानंतर एका रिकाम्या आयताकृती बॉक्सवर रंगीत कागद चिटकवा. त्यावर गोल्डन लेस वापरून तो बॉक्स आकर्षक करा. हा बॉक्स आणि आपण केलेली कमान चिटकवा. त्याच्या बाजूला तुम्ही कागदाच्या छोट्या तक्क्याही लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा थांबणार पगार! वेतन अधीक्षकांचे शाळांना आदेश; कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत; ‘टीईटी’ संदर्भातील अपडेट काय? वाचा...

सोलापुरात आयटी पार्क होणारच! दरवर्षी येथे तयार होतात ६८०० इंजिनिअर, विमानसेवा सुरू, रेल्वे, महामार्गांची कनेक्टिव्हीटी, उजनी धरणात मुबलक पाणी, सुपर टॅक्स माफ, हायस्पिड इंटरनेटही

आजचे राशिभविष्य - 9 सप्टेंबर 2025

OBC Struggle Committee:'ओबीसी संघर्ष समितीचा साताऱ्यात मोर्चा'; सरकारविरोधात घोषणाबाजी, मराठा आरक्षणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी

चयापचय दर वाढवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT