Ganesh Chaturthi 2024  esakal
ganesh darshan

Ganesh Chaturthi 2024 : देवांचाही देव मोरया ! गणपती बाप्पांच्या सजावटीत साकारा आई अंबाबाई,स्वामी अन् देवाधिदेव महादेव!

Ganpati Decoration Ideas : गेल्या काही वर्षांपासून गणपती बाप्पाच्या सजावटीत इतर देवांच्या प्रतिकृतीही साकारल्या जातात.

सकाळ डिजिटल टीम

Ganpati Bappa Decoration Ideas :

गणपती बाप्पा साठी वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्याच्या आयडिया तुम्ही शोधत असाल. अनेक लोक किल्ल्यांचे, ग्रामीण जीवन दाखवणारे सजावट करतात. तर काही लोक केवळ फुलांच्या आणि लाईटच्या माळांपासून सजावट करतात.

गेल्या काही वर्षांपासून गणपती बाप्पाच्या सजावटीत इतर देवांच्या प्रतिकृतीही साकारल्या जातात. त्यामध्ये स्वामी समर्थ, करवीर निवासिनी आई अंबाबाई, देवाधिदेव महादेव, श्री स्वामी समर्थ आणि विठू माऊली यांचेही देखावे साकारले जातात.  (Ganpati Decoration Ideas at Home)

हे देखावे कसे साकारले जातात, त्यासाठी लागणारे साहित्य अन् ते कसे बनवायचे हे पाहुयात.

आई अंबाबाईचा देखावा

गेल्या काही वर्षापासून गणपती बाप्पाच्या मागे देखावा म्हणून आई अंबाबाईची प्रतिकृती साकारली जाते. मुकुट, मळवट भरलेला मुखवटा, भरगच्च दागिने आणि साडी इतक्या वस्तूंनी देवीची प्रतिकृती साकारली जाते. साक्षात आई अंबाबाईची प्रतिकृती साकारणे तसे भव्य दिव्य काम आहे. पण ते ठरवले तर नक्कीच सोपे आहे. त्यामुळे तुम्हीही आई अंबाबाईचे प्रतीकृती नक्कीच साकारू शकता.

श्री स्वामी समर्थ

अलीकडील काळात स्वामी भक्त देशभर पसरले आहे. त्यामुळेच स्वामींच्या मूर्ती आपल्याला घराघरात दिसून येतात. स्वामींचे श्लोक, गाणी यांचे स्टेटस रिंगटोन ही पाहायला मिळतात. गणपती बाप्पाच्या देखाव्यातही तुम्ही स्वामींना बसवू शकता. श्री स्वामी समर्थांच्या कटआउट समोर बाप्पा विराजमान झाला तर ते अधिक चांगले दिसेल. तुम्हाला यासाठी कल्पवृक्षाची प्रतिकृती ही बनवावी लागेल. कल्पवृक्षाखाली बसलेले स्वामी आणि त्यांच्यासमोर विराजमान झालेले बाप्पा हा देखावा सहज सुंदर दिसेल.

महादेवांची प्रतिकृती

गणपती बाप्पा यांचे घर म्हणजे कैलास पर्वत. कैलास पर्वतावरील गणपती बाप्पा, माता पार्वती पिता महादेव आणि बंधू कार्तिकीय यांच्यासोबत काही काळ राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांच्या देखाव्यात या देवतांचा सुद्धा समावेश करू शकता. त्यासाठी तुम्हाला शंकर-पार्वतीचे कटआउट लागतील, किंवा तुम्ही महादेवाच्या पिंडीचाही देखावा साकारू शकता. फक्त याच्या बाजूने तुम्हाला कैलास पर्वताची प्रतिकृती उभारावी लागेल.

विठू माऊली

तुम्ही अनेक फोटोमध्ये आणि स्टेटस मध्ये विठू माऊली चे कट आउट असलेले फोटो पाहिले असतील. विठ्ठलाचे हे फोटो आकर्षक दिसतात. तुम्ही तुमच्या गणपती बाप्पा समोर वारकऱ्यांचा छोट्या छोट्या देखावा साकारू शकता. आणि मागे श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे प्रतिकृती लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात आठ विधेयके केली जाणार सादर

Sarpanch Election : गावगाड्यातल्या राजकारणात बदल होणार, कोल्हापूर जिल्ह्यात १०२६ सरपंचांचे पुन्हा आरक्षण

Israel Strike On Syria : सीरियावर इस्त्रायलयचा सर्वात मोठा हल्ला; गाझा अन् इराण नंतर का केले लक्ष्य?

Monsoon Update: मराठवाड्यात पावसाची चाहूल; नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता, जाणून घ्या कसे असेल हवामान?

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT