Ganapati story esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : भाद्रपद चतुर्थीला का घेवू नये चंद्राचे दर्शन, हे आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला जे काही सौंदर्य लाभल आहे त्याचा कधीही गर्व करु नये. याचसोबत आपल्याकडे सौंदर्य आहे म्हणून दुसऱ्याच्या रुपावर हसण हे देखील वाईटच. असंच एकदा चंद्रदेवाने गणपती बाप्पासोबत केले होते, मात्र त्यानंतर गणपती बाप्पाने चंद्रदेवाला असा धडा शिकविला कि पुन्हा चंद्राने कोणासोबतही असे वागण्याचे धारिष्ट्य केले नाही.

गणपतीला हत्तीचे मुख प्राप्त झाल्यानंतर सर्वजण त्यांना गजमुख म्हणायला लागले. यातच गणपती बाप्पाची शरीर प्रकृती स्थुल होती. मात्र त्यांच्या अफाट बुद्धीमत्तेचा सर्वजण आदर करत. पण चंद्र मात्र गणपतीच्या या रुपाला सदैव नाव ठेवत असे. कारण चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व झाला होता.

एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते. उंदराला अचानक वाटेत साप दिसला त्यामुळे तो दचकला. उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुणूकन खाली पडले. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसायला लागला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की "आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल". त्यादिवसापासून चंद्राचे तेज कमी झाले. गणेशाच्या शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला. मग त्याने ब्रम्ह देवाला प्रार्थना केली. तेव्हा ब्रम्ह देवाने सांगितले, तुला शाप गणेशाने दिला आहे, त्यामुळे तो मागे घेण्याचा अधिकार हा गणेशाचाच आहे. त्यामुळे तू गणेशाला प्रसन्न कर.

शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस "भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी" तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की, त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल.

अशा प्रकारे गणपती बाप्पाने चंद्राला त्याच्या सौंदर्याचा आलेला अहंकार तर उतरवलाच पण रुप कसेही असले तरी बुद्धीमत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे हे देखील सर्वांना पटवून दिले. म्हणूनच तर बाप्पाला सर्वात बुद्धीमान म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

Latest Marathi News Live Update : भाजपच्या मंचावरुन अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा

सुभेदारांचा जावई येतोय... 'ठरलं तर मग' मध्ये होणार अस्मिताच्या नवऱ्याची एण्ट्री; कोण आहे हा अभिनेता जो साक्षीसोबत करतोय फ्लर्ट?

Weekly Horoscope Prediction 2025: 'या' आठवड्यात कर्कसह 2 राशींवर राहील धनलाभाचा वर्षाव, नोकरीत मिळेल प्रमोशन!

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

SCROLL FOR NEXT