रावणाला लंकेत न्यायचे होते शिवलिंग; गणेशाच्या बुद्धीचातुर्यापुढे टेकले हात

रावणाला लंकेत न्यायचे होते शिवलिंग; गणेशाच्या किमयेने अवघे तारले
Ganapati and Ravan
Ganapati and Ravanesakal

अनेकवेळा आपल्या आसपास अशी लोक आपल्याला भेटतात जी सर्वज्ञानी असतात. बुद्धी, शक्ती, आणि धन- धान्य समृद्धीने सर्वसंपन्न असे असतात. मात्र स्वभाव आणि विचार याचा या सर्वांवर अधिकचा प्रभाव होवू लागतो. असे आपल्या समोरील व्यक्तीने आपण काबीज करुन त्याच्यावर हक्क गाजवू शकतो अशी भावना त्यांच्यात जागृत होते. असेच घडले लंकाधिपती रावणाच्या बाबतीत. भगवान शंकरांना कैलास पर्वतावरुन रावणाला थेट लंकेत न्यायचे होते मात्र गणेशाच्या बुद्धीचातुर्यापुढे तो यशस्वी होवू शकला नाही. काय नेमके घडले होते हे जाणून घेण्यासाठी हा लेख पुर्ण वाचा.

(Ancient Gokarna Mahabaleshwar story of Ravna meet Lord Ganeshaa and Shivlinga Ganeshotsav 2022)

Ganapati and Ravan
...अन् गणपती बाप्पाने गर्विष्ठ आणि अहंकारी कुबेराला शिकवला धडा

रावण हा शिव शंकराचा निस्सीम भक्त होता हे सर्वांनाच माहित आहे. रावणाची आई केकसीसुद्धा भगवान शंकरांची निस्सीम भक्त. ती नित्यनियमाने भगवान शंकरांची पंचधान्याने निर्मित शिवलिंगाचे पुजन करीत असे. तीची पुजाअर्चा पुर्ण होई पर्यंत ती पाण्याचा थेंब देखील प्यायची नाही. या पुजेतून ती केवळ रावणाचा उत्कर्ष व्हावा अशीच प्रार्थना सदैव करायची. राक्षसवृत्तीच्या रावणाचा उत्कर्ष झाल्यास सर्व देवतांसाठी हे घातक ठरेल अशी भिती देवराज इंद्रांना वाटायची त्यामुळे त्यांनी रावणाची आई ज्या शिवलिंगाची पुजा करायची ते शिवलिंगत्यांनी नदीच्या पाण्यात वाहून नेले. केकसीला सकाळी पुजेच्यावेळी शिवलिंग दिसले नाही त्यामुळे ती निराश झाली. त्या दिवसापासून तीने अन्न- पाण्याचा त्याग केला. रावणाला आपल्या आईच्या या वेदना बघवल्या जात नव्हत्या म्हणून त्याने आईला वचन दिले कि तो स्वतः कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांचे आत्मलिंग तिला आणून देईन. वचन दिल्याप्रमाणे रावण कैलास पर्वताकडे निघाला. कैलास पर्वतावर रावणाने दिर्घकाळ घोर तपश्चर्या केली. चारही वेदांचे ज्ञान त्याने प्राप्त केले. ६४ कलांमध्ये तो प्रविण झाला. त्याच्या या घोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले अन् त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला सांगितले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग तुला हव ते मी देईन. रावण मुळातच कैलास पर्वतावर भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळविण्याच्या उद्देशाने आला होता. त्यामुळे त्याने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांना त्यांचे आत्मलिंग मागितले. घोर तपश्चर्येतून रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न केले होते. त्यामुळे शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले, मात्र हे देताना रावणाला सांगितले कि तू हे आत्मलिंग येथून घेवून निघालास कि थेट तुझ्या इच्छित स्थळी पोहच. वाटेत हे लिंग तू जर खाली ठेवले तर जिथे लिंग ठेवशील तेथेच याची स्थापना होवून जाईल. रावणाने भगवान शंकरांचे बोलणे ऐकून होकार दिला आणि आनंद आणि उत्साहात तो घोर तपश्चर्येतून प्राप्त केलेले भगवान शंकरांचे आत्मलिंग घेवून लंकेकडे निघाला.

Ganapati and Ravan
Ganeshotsav 2022 : हे आहे गणपती स्थापनेचे महत्व, भगरे गुरुजी सांगतात...

रावणाने शंकरांचे आत्मलिंग प्राप्त केले आहे हे कळताच सर्व देवतागण चिंतातूर झाले. आणि रावणाने आत्मलिंग लंकेत नेले तर तो त्याचा दुरूपयोग करेल आणि हे संपुर्ण ब्रम्हांडासाठी घातक असेल. कृपया त्याला थांबवा अशी प्रार्थना सर्व देवांनी भगवान शंकरांना केली. मात्र मी त्या वर दिला आहे, तो मी पुन्हा मागू शकत नाही असे भगवान शंकरांनी सर्व देवांना सांगितले. यावर काहीतरी तोडगा काढावा यासाठी सर्व देवतागण ब्रम्हदेवाकडे गेले असता, ही समस्या आता केवळ शिव- पार्वतीपुत्र गणेश सोडवू शकेल असे ब्रम्ह देवाने सर्व देवतांना सांगितले.

सर्व देवांनी गणेशाला रावणाला वाटेत थांबविण्याची आणि त्याच्या उद्देशापासून त्याला रोखण्याची आज्ञा केले. गणेशाने सर्व देवांना वंदन केले. माता पार्वती पिता शंकराना वंदन करत ते रावण ज्या मार्गाने लंकेत निघाला होता त्या मार्गावर निघाले. सर्वात आधी त्यांनी एका लहा बालकाचे रुप धारण केले. रावणाच्या सतत वाटेत जावून आपण दमला असाल थोड्यावेळ विश्रांती घ्यावी अशी विनंती करु लागले. रावण थांबायला तयार नव्हता. तेव्हा या बालकाने त्यांनी विश्रांती नाही तर किमान पाणी प्यावे अशी विनंती केली. कैलासापासून पायी निघालेला रावणही दमला होत्या, त्यामुळे त्यानेही पाणी पिण्यास होकार दिला. पोटभर पाणी पिऊन त्या बालकाचे धन्यवाद रावणाने केले आणि पुन्हा आपल्या वाटेला निघाला. असे वाटेत अनेकदा घडले या बालरुपी गणेशाने रावणाला इतके पाणी पाजले कि आता रावणाला वाटेत लघूशंका लागली होती.

लघुशंका तर आली होती मात्र त्यासाठी त्याला शिवलिंग खाली ठेवावे लागणार होते म्हणून तो तसाच पुढे चालत राहीला. पुढे असह्य झाल्याने काहीतरी उपाय करावा असे त्याने ठरवले. वाटेत त्याला काही गायी आणि त्यांचा गुराखी दिसला. त्याने गुराख्याला विनंती केली की मला लघुशंकेला जायचे आहे कृपया हे शिवलिंग आपण काही काळ आपल्या हातात ठेवावे. ते कृपया खाली ठेवू नये. गुराखी हो म्हणाला पण तु नक्की येशील ना हे घ्यायला असे रावणाला विचारले. त्यावर मी अवश्य येईन असे रावण उत्तरला. गुराखी म्हणाला मला नाही वाटत तू येशील, त्यापेक्षा मी तुला तीन वेळा आवाज देईल. त्यानंतरही तू आला नाहीस तर हे शिवलिंग मी खाली ठेवेन. रावण म्हणाला त्याची आवश्यकता भासणार नाही मी नक्की येईन, असे सांगून रावणाने हातातील शिवलिंग त्या गुराख्याच्या हातात दिले आणि काहीही झाले तरी मी येईपर्यंत खाली ठेवू नको अशी विनंती केली आणि रावण लघुशंकेसाठी गेला.

Ganapati and Ravan
Ganesh Utsav : बाप्पाला आवडणाऱ्या गव्हाच्या खीरीत 'हे' महत्वाचे घटक टाकताय ना? चव आणखी वाढेल

हा गुराखी म्हणजेच गणेशाचाच अवतार. त्याने ठरल्याप्रमाणे रावणाला ३ वेळा आवाज दिला पण लघुशंका आणि त्यानंतर संध्या करुन येई पर्यंत या गुराख्याचे तीन वेळा आवाज देवून झाले होते. मग काय त्याने ते शिवलिंग खाली ठेवले. शिवलिंग खाली ठेवताच मोठ मोठ्याने विजांचा कडकडाट होवू लागला. ते शिवलिंग आता त्याच ठिकाणी स्थापन झाले होते. हे पाहून रावण अत्यंत क्रोधीत झाला. रावणाला चिडलेला पाहून गुराखी आपल्या गायींसह पळायला लागला. शेवटी गणेशाचा उद्देश सफल झाला होता. मात्र हा गुराखी गणेशच आहे हे रावणाला माहीत नव्हते. त्यामुळे रावण गुराख्याला शिक्षा करण्यासाठी त्याच्या मागे धावू लागला. गुराखी गायींसह पळत असताना अचानक गायब झाला. हळुहळु एक एक गाय सुद्धा गायब व्हायला लागली. त्यातील एका गायीचा कान रावणाने पकडला ती गाय सुद्धा जमीनीत समाविष्ट होत होती. मात्र चिडलेल्या रावणाने तीचा हाती धरलेला कान ओढण्यास सुरुवात केली. मात्र ही देवाचीच लीली असल्याने फार काळ तो तिचा कान ओढू शकला नाही. मग त्याने स्थापित झालेल शिवलिंग पुन्हा तेथून काढण्याचा आतोनात प्रयत्न केला. त्याच्यातील सर्व दैवी शक्ती त्याने तेथे पणाला लावली मात्र काही करता शिवलिंग तेथून हलेना. शेवटी ही तर भगवान शंकरांचीच आज्ञा होती. तेव्हा गणेशही आपल्या मुळरुपात तेथे आले. त्यांना पाहून चिडून म्हणाला, पार्वतीपुत्र तुम्ही माझ्या तपश्चर्येचा भंग केला. तुम्ही असे करणे उचित ठरणार नाही असे म्हणते रावण आपली अपार शक्ती ते शिवलिंग काढण्यासाठी लावत होता.

तेव्हा गणेश म्हणाले, लंकाधिपती रावण आपण मोठे तप करुन हे शिवलिंग मिळवले आणि ते लंकेत नेण्याचा उद्देशही आपला चांगला होता यात शंका नाही. मात्र आपली राक्षसी वृत्ती ही या कृतीला जबाबदार ठरली आहे. आईसाठी शिवलिंग तुम्ही मिळवलं मात्र लंकेत शिवलिंग स्थापन करणार म्हणजे तुम्ही त्याचा दुरुपयोग करणार हे सृष्टीच्या कल्याणासाठी अहिताचे आहे त्यामुळे भगवान शंकरांच्याच आज्ञेने आणि सर्व देवतांच्या इच्छेने हे झाले आहे. आपण आता किती प्रयत्न केले तरी ते शिवलिंग येथून हलणार नाही. कृपया आपण आता शांत व्हावे. तेव्हढ्यात सर्व देव तिथे अवतरले. साक्षात भगवान शंकरांना पाहून आता येथे आपण काहीच करु शकत नाही हे रावणाच्या लक्षात आले अन् त्याने शिवलिंग तेथून काढण्याचा अट्टहास सोडला. व जेथे ते शिवलिंग स्थापन झाले होते. तेथेच त्याची पुजा करुन ज्या गायीचा कान त्याने रागापोटी ओढला होता त्या गोमातेची क्षमा याचना करु लागला. रावणाने ते शिवलिंग मिळविण्यासाठी केलेले घोर तप अन् गणेशाच्या लीलेने ज्या स्थळी ते स्थापन झाले होते तेथून ते काढण्यासाठी महाबली रावणाने केलेल्या आपल्या अपार शक्तीचा उपयोग, अन् गायीचा धरलेला कान यावरुन त्या शिवलिंगाला गोकर्ण महाबलेश्वर असे नामकरण करण्यात आले.

Ganapati and Ravan
Ganeshotsav 2022 : जाणून घ्या, परदेशात काय आहे गणेश चतुर्थीचा मुहूर्त अन् तिथी

काही काळाने रावणाने सहकुटूंब या गोकर्ण महाबलेश्वर शिवलिंगाचे दर्शनही घेतले होते.

अशा प्रकारे शिवलिंग कैलासपर्वतावरुन लंकेत नेण्याचा प्रयत्न हा गणेशाच्या बुद्धीचातुर्याने असफल ठरला. म्हणूनच गणपती बाप्पाला 'संकटी पावावे' असे म्हणतात. आणि बाप्पा पावतोही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com