नागपूर : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त असल्याने राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मुळ गावी जाणाऱ्यांची संख्या या दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे, मुंबईला जाणाऱ्या तसेच नागपूरला परतणाऱ्या रेल्वेगाड्या सध्या हाऊसफूल असून सर्वच गाड्यांमध्ये वेटिंग आहे.
विदर्भातील नागरिक नोकरीनिमित्त पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. तसेच नातेवाईक सुद्धा बहुसंख्येने आहेत. गणेशोत्सव यंदा सर्वत्र साजरा होत असताना मुळ गावी परतणारे तसेच नातेवाइकांकडे हा उत्सव साजरा करणाऱ्याकरिता जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील दगडूशेट हलवाईचा गणपती आणि मुंबईतील लालबागचा राजा यासह इतरही मानाचे गणपती असल्याने येथे गणेशोत्सव बघण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.
त्यामुळे या गणेशोत्सवाच्या १० दिवसाच्या काळात पुणे, मुंबईच्या रेल्वेगाड्या हाऊसफूल आहे. जवळपास सर्वच गाड्यांमध्ये वेटिंग असल्याने प्रवाशांना रेल्वे व्यतिरिक्त इतरही साधनांचा विचार करावा लागत आहे. रेल्वेत वेटिंग असल्याने अनेक प्रवासी ‘ट्रॅव्हल्स’ला पसंती देत आहे. अशा स्थितीत ट्रॅव्हल्स चालकांची चांदी आहे. त्यामुळे सणासुदीचे दिवस पाहून ट्रॅव्हल्स चालकांनी सुद्धा आपले भाडे वधारले आहे. अशा स्थितीत लांबचा प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. एकीकडे ट्रॅव्हल्सचे भाडे जास्त असल्याने सामान्य प्रवासी रेल्वेला पसंती देत आहे. मात्र, वेटिंग असल्याने पुरुषांना जनरल डब्याचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना जनरल डब्यात बसने परवडत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
या गाड्यांमध्ये सर्वाधिक वेटिंग
महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे दुरांतो एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, मुंबई एलटीटी एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सर्वाधिक वेटिंग सुरू आहे.
गणेशोत्सवात गाड्या रद्द
आझाद हिंद एक्स्प्रेस, बिलासपूर पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल, पुणे हटीया एक्स्प्रेस, पुणे संतरागाची एक्स्प्रेस या गाड्या इंटरलॉकींगच्या कामामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेचे भाडे परवडणाऱ्या सामान्य प्रवाशांना महागड्या ट्रॅव्हल्स सारख्या पर्यायी साधनांचा विचार करावा लागत आहे.
अनेक रेल्वेगाड्या रद्द
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळात राजनांदगाव-कळमना तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग कामामुळे कचेवानी स्थानकावर पायाभूत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेतून जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आले आहे. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या : १८०३३ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, १८०२९ एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी मेल वाया नागपूर, १२१३० हावडा-पुणे आजाद हिंद एक्स्प्रेस, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस ३० ते ४ सप्टेंबरपर्यंत तर १२१०१ एलटीटी-शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ३० ते ३ सप्टेंबरपर्यंत, १२१०२ शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस १,४, ५ सप्टेंबरला, २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस २ सप्टेंबर, २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस ४ सप्टेंबर, १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस २ आणि ३ सप्टेंबर, १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस ४ आणि ५ सप्टेंबर, २२५१२ कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेस ३ सप्टेंबर, २२५११ एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस ६ सप्टेंबर, २०८२२ संतरागाछी-पुणे एक्स्प्रेस ३ सप्टेंबर, २०८२१ पुणे-संतरागाछी एक्स्प्रेस ५ सप्टेंबर, १२८४९ बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस १ सप्टेंबर, १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस २ सप्टेंबर, १२१४५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस ४ सप्टेंबर, १२१४६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस ६ सप्टेंबरला रद्द करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.