Ganeshotsav 2022  esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2022 : ...तर अशाप्रकारे उंदीर मामा झाले गणपती बाप्पाचे वाहन

सकाळ डिजिटल टीम

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विघ्नहर्त्या गणेशाचे सर्वत्र आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या मुर्तीचे दर्शन घेताना आपल्याला उंदीर मामाचेही दर्शन होते. मात्र बाप्पाचे रुप पाहून हा पिटूकला उंदीर गणेशाचे वाहन कसा झाला याबद्दल पुराणात अनेक कथा आहेत. बाम ऋषींच्या शापाने उंदीर झालेल्या गंधर्वाने पाराशर ऋषींच्या आश्रमात मांडलेल्या उच्छादाचीही कथा आहे. ही कथा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. आता आपण याच संदर्भाची मुषकराज राक्षसाची कथा जाणून घेणार आहोत.

पुराणातील कथेनुसार मुषकराज नावाच एक महाभयंकर आणि पराक्रमी राक्षस होता. त्याने पृथ्वीलोकासह देवलोकात उच्छाद मांडला होता. पृथ्वीवासी व सर्व देव त्याच्या या उच्छादाला हैराण झाले होते. त्यामुळे सर्वांनी महादेवाचा धावा केला. तेव्हा महादेवांनी हे विघ्न दूर करण्यासाठी विघ्नहर्त्या गणेशाला महादेवांनी आज्ञा केली. तेव्हा आपल्या पित्याची आज्ञा मान्य करत गणेशाने या राक्षसाचा विनाश करण्यासाठी पिता महादेवांचे आशिर्वाद घेतले. आणि त्याला रणभूमीमध्ये आव्हान दिले. गणेशासंगे मुषकराज राक्षसाने युद्ध सुरु केले. मात्र गणेशाच्या शक्तीपुढे मुषकराजाची शक्ती तरली नाही. गणपती बाप्पाने युद्धात राक्षसाला हरवले. आपले प्राण सोडताना या राक्षसाने गणेशाला वर मागितला.

गणेशानेही त्याला होकार देत काय वर हवा आहे ते विचारले. तेव्हा मुषकराज म्हणाला, कि मला तुमचे वाहन होण्याचा मान मिळावा. तेव्हा गणेशाने त्याला दिला मात्र तू माझे वाहन होशील ते तुझ्या नावाप्रमाणे मुषक राहशील. आणि त्याच क्षणी गणेशा समोर मुषक रुपामध्ये प्रकट झाला अन् गणपती बाप्पा त्याच्यावर स्वार झाले. अशाप्रकारे गणपती बाप्पाचे वाहन हे पिटूकला उंदीर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT