Ganeshotsav 2023 Puja
Ganeshotsav 2023 Puja Sakal
Ganesh Chaturti Festival

Ganeshotsav 2023 Puja : बेल, शमीच्या वृक्षाचे आयुर्वेदिक गुणधर्म माहितीयेत का?

सकाळ डिजिटल टीम

- डॉ. कांचनगंगा गंधे, पुणे

- अशोक कुमारसिंग, लखनौ

वनस्पती सृष्टीतली विविधता आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीची तालबद्धता, माणसाचे आरोग्य यांच्यातल्या नात्याची जाण आपल्या ऋषीमुनींना होती. निसर्गाचं सखोल निरीक्षण करून, सृष्टीतलं ठराविक लयीत फिरणारं चक्र त्यांना कठोर तपश्चर्यमुळे ज्ञात झालं!

म्हणूनच काही वनस्पतींना देवपूजेत समाविष्ट केलं, तर काहींना सांस्कृति महत्त्व दिलं. 'बेल' शंकराच्या पूजेत, तर दसरा सणाला आपट्याच्या पानांबरोबर शमी वृक्षालाही महत्त्व दिलं.

बेल 

तीन किंवा पाच पर्णिकांचे संयुक्त पान आणि शंकराचं नातं फार पूर्वीपासून आहे. स्कंद पुराणात बिल्वपत्राची महती सांगितली आहे. त्रिदळातील डावं पान ब्रह्मदेव, उजवं विष्णू आणि मधलं पान शिवपार्वती असल्याचा उल्लेख आहे. शंकराच्या देवळाजवळ बेलाचे वृक्ष मुद्दाम लावतात.

याच्या डहाळ्याही पवित्र मानून त्याचा उपयोग यज्ञाच्या वेळेस करतात. बेलाचा वृक्ष जुना झाला की खोडाला खाच पाडली तर त्यातून मंद सुवासाचं पाणी बाहेर पडतं. हा वृक्ष मातीची धूप रोखण्यास मदत करतो. पक्षी, किटक, मुंग्या, छोटे प्राणी यांचे 'निवासस्थान' आहे.

फुलांमध्ये मध असल्यामुळे मधमाशा, फुलपाखरांना आयतं खाद्य मिळतं. बेलाचा वृक्ष आयुर्वेदातही महत्त्वाचा समजला जातो. पानं, साल, मुळं, दाह, वेदना, जळजळी कमी करतात. सर्दी, खोकला, दमा यासारख्या विकारात बेलाच्या पानांची वाफ घेतल्यास आराम मिळतो. त्वचेच्या विकारांवर पाने वाटून लावतात.

शमी 

मध्यम उंचीचा काटेरी वृक्ष 'सर्वगुणसंपन्न' आहे. कमी पावसाच्या भागात जोमाने वाढतो. धुळीच्या वादळातही कणखरपणे उभा राहतो. हवेतला नत्र वायू शोषून घेऊन माती नत्रयुक्त सुपीक करतो. शमीची पानं गुराढोरांना, वाळवंटात उंटांना, शेळ्यामेंढ्यांना 'खाद्य' म्हणून देतात.

राजस्थानात शमी 'खेजडी' म्हणून ओळखलं जातं. प्रभू रामाचं हे आवडतं झाड, या झाडाखाली ध्यानधारणा करून त्याला रावणाच्या विरूद्ध लढण्यासाठी पवित्र शस्त्रास्त्रे ऋषिमुनींनी दिली. पांडवांनी वनवासात जाताना या झाडाच्या खोडात शस्त्रास्त्रे लपवली होती.

उष्णतेमुळे होणारे विकार, डोक्यात होणारी आगपेंड शमीच्या पानांनी कमी होते. सालीचा लेप लावला तर संधीवात कमी होतो

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT