Hartalika Vrat 2024 esakal
Ganesh Chaturthi Festival

Hartalika Vrat 2024 : हरतालिकेचे व्रत कथा वाचल्या शिवाय पूर्णच होत नाही ! जाणून घ्या हरतालिकेची पौराणिक कथा

Hartalika Vrat 2024 : भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीमातेला करावे लागले हरतालिकेचे व्रत, जाणून घ्या व्रताची पौराणिक कथा

सकाळ डिजिटल टीम

Hartalika Vrat Katha :

विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हरतालिकेचे व्रत करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो. यावेळी हरतालिकेचा उपवास शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार आहे.

हरतालिकेचा उपवास करून त्यादिवशी देवीची पूजा केली जाते. पूजेची मांडणी करून देवीची कथा तिच्यासमोर वाचली जाते. हरतालिकेच्या व्रतादिवशी तिची पौराणिक कथा वाचावी लागते.त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. (Hartalika Vrat Katha)

एके दिवशी शंकरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं ? श्रम थोडे, आणि फल पुष्कळ, असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेहि मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात 'सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो.

तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलस. चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी ? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनि आले. (Hartalika) 

हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले.

नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावांचून मला दुसरा पति करणे नाही, असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा ? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं.

तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतियेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पति व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही ! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस.

मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला, त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधि असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी वाचावी. व रात्री जागरण करावं. या व्रतानं साता जन्माचं पातक नाहीसं होतं.

राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्र येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhar Card : 'यासाठी' आधार कार्ड बाद, लाखो प्रमाणपत्र होणार रद्द, पोलीस तक्रारीचाही इशारा! राज्य सरकारचा नवा GR काय?

सर्फराज खान, अभिमन्य ईश्वरन यांच्यासाठी कसोटी संघाचे दार कायमचे बंद? गौतम, गिलचा त्यांच्यावर विश्वास नाही?

Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; प्रचाराची मुदत 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवली

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT