Hartalika Puja Katha esakal
Ganesh Chaturthi Festival

Hartalika Puja Katha: हरतालिकेच्या कथेच पुस्तक सापडत नाहीय, काळजी करू नका ही घ्या संपूर्ण कथा!

...म्हणून या व्रताला हरतालिका व्रत असं म्हणतात.

Pooja Karande-Kadam

Hartalika Puja Katha :  श्रावण महिना संपला की सगळ्यांना वेध लागतात श्री गणरायांच्या आगमणाचे. यंदा १९ सप्टेंबरला गणपती बाप्पा येणार आहेत. गणेशोत्सवाची सुरूवात १८ तारखेला असलेल्या हरतालिका मातेच्या पुजनानेच होते.

भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने केलेले हे व्रत होय. हे व्रत केल्याने मनासारखा जोडीदार मिळतो अशी भावना आहे. त्यामुळे पिढ्यांपिढ्या हे व्रत घरोघरी केले जाते.

दरवर्षी गणपती बाप्पाच्या आधी हरतालिका मातेच्या मूर्तींचे आगमण आणि पूजन होते. हे व्रत निर्जल करावे लागते, त्याची कथा वाचावी लागते. तुम्हीही यंदा व्रत करणार असाल तर त्याची कथा तुम्ही इथे आरामात वाचू शकता.  

हरतालिकेची कथा अशी आहे

एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीन शंकराला विचारले, "महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? मोठे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा.

तेव्हा शंकर म्हणाले, "नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णु श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णु श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे.

आता तु मला कशी प्राप्त झालीस ते तुला सांगतो.मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाल्लीस. ऊन, पाऊस, वारा ही तिन्ही दुःख सहन केलीस.. तुझे श्रम पाहून तुझ्या पिता हिमालयाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारदमुनी आले. हिमालमाने त्यांचे स्वागत पूजन करुन येण्याचं कारण विचारलं, तेव्हा नारद म्हणाले, "तुझी कन्या उपवर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी.

तोच तिच्यासाठी योग्य वर आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे पाठविले आहे. म्हणून मी आलो इथे आहे. आपल्या कन्येचा स्विकार स्वतः विष्णूदेव करणार हे ऐकल्यावर हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे गेले. त्यांना ही हकीकत कळविली. (Hartalika )

नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं तुला ही गोष्ट सांगितली, मात्र ही गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. हे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करणं नाही; असा माझा निश्चय आहे. असे असूनही माझ्या पित्यानं मला विष्णूला देण्याचे कबुल केलं आहे.

ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं. तिथे एक नदी तुमच्या दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापन केलीस. त्याची मनोभावे पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलंस, त्या पुण्याईने माझे इथलं आसन हललं, अन् मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं,

"तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही." नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा पिता हिमालय तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं.

मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशाप्रकारे या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून या व्रताला हरतालिका व्रत असं म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Forecast In Maharashtra : पर्जन्यमानात सुधारणा! महाराष्ट्रात पावसाला वेग येणार; २३ जूननंतर राज्यभर सर्वदूर पाऊस, IMD चा अंदाज

Reliance Success Story: फुटबॉल मैदानावरील बैठक अन् बदललं अंबानींचं नशीब! कसं उभं राहिलं रिलायन्सचं 18 लाख कोटींचं साम्राज्य?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT