How was Ganeshotsav in 1963 Ganesh festival history Marathi Article  
Ganesh Chaturti Festival

Ganesh Festival 2023 : घोड्याच्या टापेखाली साहेब ठार...; असा होता १९६३ सालच्या सार्वजनिक गणेशोत्सव

रोहित कणसे

राज्यात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात मागील कित्येक वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या आनंदाने साजरी केली जात आहे. दरवर्षीच्या गणेशोत्ववावर सामाजिक आणि राजकी घटनांचे पडसाद देखील उमटताना पाहायला मिळतात. राजकीय घडामोडीनुसार गणपती समोर उभारले जाणारे देखावे देखील बदलतात.

सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात भारताने नुकतेच यश मिळवलेल्या चांद्रयान-३ मोहिमेचे देखावे पाहायला मिळत आहेत. अशाच पद्धतीने १९६३ सालच्या गणेशोत्सवावर युद्धस्थितीचं सावट पाहायला मिळालं होतं. इतकेच नाही तर भारत-चीन या दोन देशातील संघर्षाचा देखावा देखील गणेशोत्सवात पाहायला मिळाला आहोत.

तारीख १८ ऑगस्ट सन १९६३ रोजीच्या 'सकाळ'मध्ये छापून आलेल्या बातमीत बेळगाव शहरात तेव्हा साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाबद्दल माहिती देण्यात आली होती.

बेळगाव शहरातील पांगुळ गल्लीत गणपतीच्या सजावटीमध्ये युद्ध विषयक प्रसंग दाखवण्यात आला होता, त्यामध्ये एक सैनिक उभा आणि त्याची पत्नी आपल्या मुलाला वडिलांप्रमाणे सैनिक होण्याचा आदेश देताना दाखवण्यात आले होते. तर शहाजी चौकात झाशीची राणी आपल्या मिलाला पाठीला बांधून घोडा भरधाव फेकून एका गोऱ्या युरोपियन साहेबाला घोड्याच्या टापेखाली ठार केल्याचा देखावा बसवण्यात आला होता. टिळक चौकात गणपती कृष्णाप्रमाणे बसल्याचे दाखवले होते, शिवीजी चौकातील गणपती आपल्या मातेच्या मांडीवर बसलेला दाखवण्यात आले होते.

तर गणपती गल्लीतील प्राथमिक शाळेत बसवण्यात आलेला सार्वजनिक गणपतीच्या मंडपात संत मिराबाई विषाचा प्याला हाती घेऊन प्राशन करत असल्याचा देखीवा होता. तर सिंधी निर्वासित समाजाच्या गल्लीत सार्वाजनिक गणपती सिंहावर बसलेला आणि हिमालयातून शंकर पार्वती पाहात आहेत असे दाखवण्यात आले होते.

इतकेच नाही तर शहरात एका ठिकाणी झाडावर माचा बांधून शिकारीस बसलेला गणपती आणि समोर सिंह, माकड, हरिण वगैरे प्राणी दिसत आहे. टिळकवाडीत होडीत बसून जलपर्यटन करणारा गणपती, भातकांडेगल्लीत गणपती शेजारी ओढणी घेतलेली सुंदर स्त्री उभी असल्याचे दाखवले आहे. तर रविवार पेठेत गणपतीसोबत शंकर पार्वतीच्याही प्रतिमा ठेवल्या आहेत.

श्रीरामपूर येथे या वर्षी कुठलेही कार्यक्रम ठेवण्यात आले नव्हते, श्रीरामपूर शहरातील गणपतीफुठे या वर्षी फक्त आरास करण्यात आलीह होती. आझाद मैदान व लोकमान्य गणेश मंडळ या दोन प्रमुख गणेश मंडळात दरवर्षी चढाओढ असते मात्र या वर्षी या दोन्ही गणेशोत्सवात कुठलेही कार्यक्रम नसल्याने चुकल्यासारखे वाटल्याचा उल्लेख सकाळच्या बातमीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT