Kolhapur Ganpati Visarjan esakal
Ganesh Chaturti Festival

Kolhapur Ganpati Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; तब्बल 2 लाख 80 हजार गणेशमूर्तींचे संकलन

सुरुवातीला या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व त्यात लोकसहभाग वाढावा म्‍हणून सरपंच, सदस्य, व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी करण्यात आली.

कोल्‍हापूर : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला (Ganpati Visarjan) यावर्षीही ग्रामीण भागात (Kolhapur Ganeshotsav) उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी तब्‍बल २ लाख ८० हजार ५१ मूर्तींचे व ५३८ टन निर्माल्याचेही संकलन करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमांतर्गत जिल्‍हा परिषदेने केलेल्या जनजागृतीचा गावागावांत चांगला परिणाम होत आहे.

त्यामुळे दरवर्षी मूर्ती संकलनाचे प्रमाण वाढत चालल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी समाधान व्यक्‍त केले. पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्ह्यातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी २०१५ पासून मूर्तिदान चळवळ राबवली जात आहे.

सुरुवातीला या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळाला; मात्र नदीचे प्रदूषण, त्याचे दुष्‍परिणाम दिसू लागल्यानंतर मात्र ग्रामीण भागातून या चळवळीला पाठिंबा वाढत गेला. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवत जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन पाटील यांनी केले होते.

या उपक्रमाबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियमित बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक अधिकाऱ्या‍ला तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली. तसेच या गणेशोत्‍सवकाळात गावोगावी भेटी देऊन प्रबोधन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व त्यात लोकसहभाग वाढावा म्‍हणून सरपंच, सदस्य, व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी करण्यात आली. परिणामी ग्रामस्थांनी नदी,नाले, तलाव यांचा विसजर्नसाठी वापर न करता तयार केलेल्या पर्यायी व्यवस्‍थेचा वापर केला. पर्यावरणपूरकर गणेशोत्‍सव उपक्रमाची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यां‍नी गावोगावी भेटी दिल्या.

यात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची,रुई,चंदूर तसेच शिरोळ तालुक्यातील जांभळी, टाकवडे व शिरढोण गावांना भेटी दिल्या. तसेच पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रमोद माने यांनीही गावभेटी करत नियोजनाची पाहणी व मार्गदर्शन केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवास मिळालेला प्रतिसाद

तालुका घरगुती सार्वजनिक एकूण

  • आजरा १६०२१ ० १६०२१

  • भुदरगड २१५७७२ २४ २१५९६

  • चंदगड १४८२६ ० १४८२६

  • गडहिंग्‍लज १९२३९ ० १९२३९

  • गगनबावडा ३९८२ १६ ३९९८

  • हातकणंगले ३१८५७ २८ ३१८८५

  • कागल २९५१३ ५५ २९५६८

  • करवीर ६१२०३ २८० ६१४८३

  • पन्‍हाळा २४७१२ १९ २४७३१

  • राधानगरी २३४३० ७ २३४३७

  • शाहूवाडी १६४४६ ४२ १६४८८

  • शिरोळ १६७५२ २७ १६७७९

  • एकूण २७९५५३ ४९८ २८००५१

वर्ष घरगुती गणेश मूर्ती संकलन

२०२१ : २ लाख ४२ हजार १९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT